Marathi News> मनोरंजन
Advertisement

इटलीत भर रस्त्यात डिंपल कपाडियांचा 'बॉबी'च्या गाण्यावर ठेका

आजही बॉबीची जादू कायम  

इटलीत भर रस्त्यात डिंपल कपाडियांचा 'बॉबी'च्या गाण्यावर ठेका

मुंबई: काही अभिनेत्रींची ओळख ही त्यांनी साकारलेल्या भूमिकांच्या बळावर होते, तर काहींची चित्रपटांच्या बळावर. अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्या बाबतीत या दोन्ही गोष्टींचा मेळ पाहायला मिळाला. बॉबी हा त्यांचा या कलाविश्वाती पहिला चित्रपट. 

मुख्य म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज अनेक दशकं उलटली असली तरीही त्याची जादू मात्र कायम आहे. 

अभिनेता अक्षय कुमार याने सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडिओ पाहता याचा प्रत्यय येत आहे. 

'इटलीतील एका ठिकाणी फिरत असताना ज्यावेळी एक कलाकार बॉबीतील एक गाणं वाजवतो....', असं कॅप्शन देत त्याने त्यासोबत #BobbyInItaly  असा हॅशटॅगही जोडला आहे. 

खिलाडी कुमारने पोस्ट केलेला हा व्हिडिओ खऱ्या अर्थाने खास ठरत आहे. कारण, त्यात खुद्द 'बॉबी' म्हणजेच अभिनेत्री डिंपल कपाडिया या मनमुरादपणे भर रस्त्यात अकॉर्डियनवर वाजणाऱ्या चित्रपटाच्या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. 

डिंपल यांच्याकडे पाहता बॉबीची जादू आणि तिच्या अदा आजही कायम आहेत, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

 

Read More