Marathi News> मनोरंजन
Advertisement

चेहऱ्यावर मास्क अन् हातात माईक, 'हाउसफुल 5' पाहून येणाऱ्या प्रेक्षकांना विचारला रिव्यू, प्रेक्षकांनी तोडांवरच दिलं उत्तर

'हाऊसफुल 5' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला याबद्दल विचारण्यासाठी स्वत: अक्षय कुमार लोकांमध्ये पोहोचला होता. 

चेहऱ्यावर मास्क अन् हातात माईक, 'हाउसफुल 5' पाहून येणाऱ्या प्रेक्षकांना विचारला रिव्यू, प्रेक्षकांनी तोडांवरच दिलं उत्तर

Housefull 5 : बॉक्स ऑफिसवर 'हाऊसफुल 5' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड गर्दी करताना दिसत आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. अक्षयकुमारसह या चित्रपटात अनेक कलाकार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार मास्क मॅन लावून जात होते. अशातच आता बॉलिवूड अभिनेता 'हाऊसफुल 5' चित्रपट हा प्रेक्षकांना कसा वाटला हे विचारण्यासाठी मास्क लावून गेला होता. 

दरम्यान, 'हाऊसफुल 5' चित्रपट संपल्यानंतर अक्षय कुमारने मास्क लावून थिएटर बाहेर येणाऱ्या प्रेक्षकांना माईक हातात घेऊन 'हाऊसफुल 5' चित्रपट कसा वाटला याबद्दल विचारण्यास सुरुवात केली. यामध्ये काही लोकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या तर काही प्रेक्षक हे अक्षय कुमारच्या प्रश्नावर उत्तर न देता निघून गेले. तर काहींनी उदास चेहऱ्याने काहीही न बोलता निघून गेले. 

मास्क लावून अक्षय कुमार प्रेक्षकांमध्ये 

याचाच व्हिडीओ सध्या अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो चेहऱ्यावर मास्क लावून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल माहिती घेताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार हा अनेक लोकांना विचारताना दिसत आहे. मात्र, काही चाहत्यांनी अक्षय कुमारच्या या व्हिडीओवर प्रेक्षकांना धारेवर धरलं आहे. ज्यामध्ये एका चाहत्याने आरे तुम्हाला अक्षय कुमारचा आवाज ओळखता येत नाही तर चित्रपट बघायला कशाला गेला अशी कमेंट केली आहे. कारण अक्षय कुमारने मास्क लावून विचारल्यामुळे अनेकांना तो ओळखू आला नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

बॉक्स ऑफिसवर 'हाऊसफुल 5'  चित्रपटाची कमाई किती? 

'हाऊसफुल 5' या चित्रपटाने रिलीजपूर्वीच मोठी कमाई केली होती. त्यानंतर बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच या चित्रपटाने पहिल्या दिवशी 24 कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 30 कोटींची कमाई केली. सध्या चित्रपटाची एकूण कमाई 54.04 कोटी रुपये इतकी झाली आहे. बॉक्स ऑफिसवरील गर्दी पाहता हा चित्रपट हिट होईल असं म्हटलं जात आहे. आतापर्यंत अक्षय कुमारच्या या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स आल्या असून तो प्रचंड व्हायरल होत आहे. 

Read More