Marathi News> मनोरंजन
Advertisement

पहिल्यांदाच एका मुलासोबत डेटवर गेला बॉलिवूड अभिनेता, आणि...

What The Love! 

पहिल्यांदाच एका मुलासोबत डेटवर गेला बॉलिवूड अभिनेता, आणि...

मुंबई : डेटिंग वगैरेची संकल्पना गेल्या काही वर्षांपासून चांगलीच स्थिरावली आहे. मुख्य म्हणजे यामध्ये काही नवनवीन ट्रेंडही आले आहेत. ऑनलाईन डेटिंग ऍप्स म्हणू नका किंवा मग सेम सेक्स डेट. काळ बदलला तसे हे ट्रेंडही बदलले. मुळात त्यांना खुलेपणाने आणि मोठ्या मनाने स्वीकृती मिळाली. याच ट्रेंडपैकी एकाचा अनुभव नुकताच एका अभिनेत्याने घेतला. 

आपल्या वेगळ्या भूमिकांपासून ते वेगळ्या दृष्टीकोनापर्यंत प्रत्येक कारणामुळे ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याने 'सेम सेक्स डेट', म्हणजे एका मुलासोबतच डेटवर जाण्याचा अनुभव घेतला. डेटिंग रिऍलिटी शोवर त्याने हा अनुभव घेतला, ज्याचं सूत्रसंचालन करतो बॉलिवूड निर्माता- दिग्दर्शक करण जोहर. हा शो म्हणजे,  What The Love! With Karan Johar.

मुलासोबत पहिल्यांदाच डेटवर जाणारा हा अभिनेता आहे, अली फजल. करण जोहरनेच या कार्यक्रमातील एक स्पर्धक Rabanne याला अलीसोबत डेटवर पाठवलं. याचविषयी सांगताना अली म्हणाला, 'सेम सेक्स डेटवर जाण्याची ही माझी पहिलीच वेळ. सुरुवातीलाच सांगतो की माझे खूप सारे गे मित्र आहेत. पण, हा अनुभव सुरुवातीला मला काहीसा संकोचलेपणा देऊन गेला. कारण मी अशा डेटवर कधी गेलो नव्हतो. पण, वेळ दवडू लागल्यावर लक्षात आलं की मी त्या मुलासोबत रुळलो होतो.'

fallbacks

सूत्रांच्या माहितीनुसार अलीसोबत डेटवर गेलेल्या  Rabanne या स्पर्धकाने मजामस्करीमध्ये गप्पा मारत असतानाच आपल्याला एखाद्या राजबिंद्या राजकुमाराने उचलावं, अशी इच्छा व्यक्त केली. अलीने लगेचच क्षणाचाही विचार न करता त्याला उचलून घेतलं. अलीचा हा अनुभव सध्या सर्वांचीच दाद मिळवून जात आहे. एक सेलिब्रिटी असण्यासोबतच व्यक्ती म्हणून कोणा एकाच्या चेहऱ्यावर आपण आनंद आणू शकलो याचं समाधान अलीच्या वक्तव्यातून व्यक्त झालं हे मात्र खरं. 

Read More