Marathi News> मनोरंजन
Advertisement

अगं ए.... पाहिलंस का कोण...? शेजारच्या कारची काच खाली होताच अनुपम खेर यांना पाहून चाहते थक्क

जेव्हा एखादा मोठा कलाकार त्याचं मोठेपण विसरुन चाहत्यांना सरप्राईज देतो..

अगं ए.... पाहिलंस का कोण...? शेजारच्या कारची काच खाली होताच अनुपम खेर यांना पाहून चाहते थक्क

मुंबई : Anupam Kher Video: रस्त्यावरून जात असताना सिग्नलला थांबल्यावर तुम्ही कधी शेजारी असणाऱ्या कारच्या काचेत पाहिलंय का? पाहिलं असेलही. पण, शेजारच्या कारमध्ये पाहिल्यावर तुम्हाला काय दिसल? ते इथं महत्त्वाचं. कारण, सध्या ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, या व्हिडीमध्ये दिसणारी दृश्य नकळतच तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणतील. 

व्हिडीओमध्ये नेमकं काय ? 
अनुपम खेर (Anupam Kher) यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की ते स्वत: कारमध्ये होते. तर त्यांच्या शेजारीच एका दुचाकीवरून एक कुटुंब जात होतं. पती-पत्नी आणि त्यांची दोन लहान मुलं, असं ते आनंदी कुटुंब. 

आपल्या शेजारीच दुचाकीवर असणाऱ्या या कुटुंबाला पाहिल्यानंतर खेर यांनी कारची काच खाली करत त्यांना, 'क्या हाल है...' असं विचारलं. आपल्याला चक्क अनुपम खेर, कसे आहात हे विचारत असल्याचं पाहून दुचाकीवर असणारी ही जोडी थक्क झाली. 

क्षणार्धासाठी काय चाललंय काय, हेच त्यांना कळेना. पुढे खेर यांनी त्यांच्या मुलांचीही नावं विचारत, या सुखी कुटुंबाला शुभेच्छा दिल्या. मला यांना भेटून फार छान वाटलं, असं म्हणत खेर यांनी हा व्हिडीओ शेअर केला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

रक्ताचं नातं नसतानाही, या विश्वरुपी घरात आपण सर्वजणच एका छताखाली आहोत याच भावनेनं खेर आणि त्या अनोळखी जोडीमध्ये झालेला संवाद सर्वांची मनं जिंकून गेला. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ ? 

Read More