Marathi News> मनोरंजन
Advertisement

मलायकाचा ग्लॅमरस अंदाज पाहून प्रियकर अर्जुनची 'ही' प्रतिक्रिया

तिच्या या लूकची कलाविश्वात बरीच चर्चा सुरु आहे. 

मलायकाचा ग्लॅमरस अंदाज पाहून प्रियकर अर्जुनची 'ही' प्रतिक्रिया

मुंबई : मलायका अरोरा ही कायमच तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. भारतीय पेहराव असो, पाश्चिमात्य वेशभूषा असो किंवा मग एखादा डिझायनर ड्रेस असो. मलायका कायमच तिच्या लूकविषयी कमालीची सजग असल्याचं पाहायला मिळालं आहे. सोशल मीडियावर तिच्या याच फॅशन सेन्सच्या बळावर फॉलोअर्सचा आकडाही वाढतच आहे. 

अशा या अभिनेत्रीला आणखी एक अफलातून अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला. यावेळी निमित्त होतं ते म्हणजे वोग ब्युटी अवॉर्ड्सचं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मलायका रेड कार्पेटवर आली आणि साऱ्यांच्याच काळजाचा ठेका चुकला. मुख्य म्हणजे तिचा हा अंदाज पाहून प्रियकर, अभिनेता अर्जुन कपूरही स्वत:ला प्रतिक्रिया देण्यापासून रोखू शकला नाही. 

मलायकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याच लूकमधील काही फोटो शेअर केले. ज्यापैकी एका फोटोवर कमेंट करत या हॉट लूकवर त्याने आगीचं चिन्हं वापरत प्रतिक्रिया दिली. एक मोठी स्लीट असणाऱ्या सफेद रंगाच्या कॉर्सेट गाऊनमध्ये मलायकाचं मादक रुप आणखी खुलून आलं होतं. याला चार चाँद लावत होती ती म्हणजे तिने लावलेली गडद लाल रंगाची लिपस्टीक, सॉफ्ट कर्ल्स आणि या रुपाला साजेशा हिल्स, असा तिचा एकंदर लूक होता. 

fallbacks

मलायकाने तिचे हे फोटो शेअर करताच कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांनीही तिची प्रशंसा करण्यास सुरुवात केली. कोणी तिच्या सुदृढतेला दाद दिली. तर, कोणी तिच्या फॅशन सेन्सवर 'क्या बात' अशी प्रतिक्रिया दिली. या साऱ्या प्रतिक्रियांमध्ये मलायकासाठी मात्र अर्जुनचीच प्रतिक्रिया खास असणार असं म्हणायला हरकत नाही. 

काही महिन्यांपूर्वीच मलायका आणि अर्जुनने त्यांच्या नात्याची ग्वाही दिली होती. तेव्हापासूनच त्यांच्या नात्याने सर्वांचं लक्ष वेधलं. विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्यापासून व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत सुट्टीवर जाणं म्हणू नका, प्रत्येक वेळी मलायका आणि अर्जुनने #CoupleGoals दिल्याचं पाहायला मिळालं आहे. 

Read More