Marathi News> मनोरंजन
Advertisement

अर्जुनला आहे वडील होण्याची इच्छा

मलायका अरोरासोबतच्या नात्यामुळेही तो बराच चर्चेत आहे. 

अर्जुनला आहे वडील होण्याची इच्छा

मुंबई : 'हाफ गर्लफ्रेंड', 'इशकजादे', 'गुंडे' या चित्रपचटांतून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेता अर्जुन कपूरने हिंदी कलाविश्वात त्याची अशी वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. स्वत:चा वेगळा चाहता वर्ग निर्माण झालेला अर्जुन येत्या काळातही काही नवनवीन भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, काही भूमिका अशा आहेत ज्या निभावण्याची त्याची मनापासूनची इच्छा आहे. अशाच भूमिकांच्या यादीतील एक म्हणजे वडिलांची. 

अर्जुन.... आणि वडील.....? बसला ना तुम्हालाही धक्का? खुद्द अर्जुननेच त्याची ही इच्छा व्यक्त केली आहे. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत अर्जुनने याविषयीची माहिती दिली. चित्रपटातील भूमिकांमध्ये वैविध्यपूर्णतेला प्राधान्य देणाऱ्या अर्जुनला रुपेरी पडद्यावर पित्याची भूमिका साकारायची आहे. इतकच नव्हे, तर एखाद्या गँगस्टरची भूमिका साकारण्याची इच्छा असल्याचंही त्याने या मुलाखतीत सांगितलं. 

'मला एखाद्या गँगस्टर चित्रपटात भूमिका साकारायची आहे. मला वडीलांचू भूमिका साकारयला आवडेल. त्याशिवाय माझ्या वयाला साजेशी एखादी उत्कट प्रेमकहाणीही साकारायला आवडेल. मी आता ३३ वर्षांचा असल्यामुळे माझ्या वयाला शोभेल अशी प्रेमकहाणी हवी', असं तो म्हणाला. आताच्या घडीला आपल्याला अमूक एक भूमिका साकारायची आहे, असं म्हणणं कठीण असल्याचं सांगत ही तर फक्त एक सुरुवातच असल्याचं त्याने स्पष्ट केलं. 

चित्रपटातील भूमिकांच्या बाबतीत आशावादी असणारा अर्जुन हा त्याच्या आणि मलायका अरोराच्या रिलेशनशिपमुळेही अनेकांचच लक्ष वेधत आहे. अर्जुन आणि मलायका आता त्यांच्या नात्याविषयी बऱ्याचदा मोकळेपणाने वावरु लागले आहेत. किंबहुना काही दिवसांतच ते विवाहबंधनात अडकणार असल्याचंही कळत आहे. 

Read More