Marathi News> मनोरंजन
Advertisement

कॅन्सरशी लढा देणाऱ्या पत्नीसाठी 'या' अभिनेत्याचा 'करवा चौथ'चा उपवास

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं  

कॅन्सरशी लढा देणाऱ्या पत्नीसाठी 'या' अभिनेत्याचा 'करवा चौथ'चा उपवास

मुंबई : पती- पत्नीच्या नात्यात अनन्यसाधारण महत्त्व असणारा करवा चौथ हा सण नुकताच पार पडला. उत्तर भारतात मोठं प्रस्थं असणाऱ्या या सणाची धूम सर्वत्र पाहायला मिळाली. 
आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी पत्नी हा उपवास करते. 

दिवसभर केला जाणारा हा निर्जळी उपवास चंद्रदर्शनानंतर सोडला जातो. 

नात्याची, सहजीवनाची वेगळीच व्याख्या सामावून घेतलेला हा सण सेलिब्रिटींनीही साजरा केला. पण, त्यात वेगळेपण जपलं ते अभिनेता आयुषमान खुराना याने. 

वेगळेपण म्हणण्यापेक्षा फक्त महिलाच का, पुरुषही त्यांच्या पत्नींसाठी हा उपवास ठेवूच शकतात हा संदेशच जणू त्याने दिला. 

काही दिवसांपूर्वीच ताहिराने तिला कॅन्सरचं निदान झाल्याचं जाहीर केलं होतं. त्या दिवसापासून ती मोठ्या धीराने या आजारपणाशी झुंज देत आहे. 

सोशल मीडिया पोस्ट पाहता ताहिराच्या धाडसाची प्रशंसा इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. आपल्या आयुष्यात असणाऱ्या याच प्रेरणेच्या स्त्रोतासाठी म्हणजेच पत्नीसाठी आयुषमानने यंदा करवा चौथचा उपवास केला. 

ट्विटरवर त्याने ताहिरासोबतचा एक सुरेख फोटो शेअर करत तिच्यासाठी उपवास करण्याचा अनुभव अतिशय छान असल्याचं सांगितलं. त्याने आणखी एक फोटो पोस्ट केला ज्यामध्ये त्याने स्वत:च्या तळहातावर त हे अक्षर मेहंदीने काढलं. 

'ती यंदाच्या वर्षी उपवास ठेवू शकत नाही. पण, मी तिच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी उवपास ठेवणार...', असं त्याने या फोटोवर लिहिलं.

आयुषमानची ही पोस्ट पाहता पत्नीप्रती असणाऱ्या प्रेमासोबत एक पती म्हणून त्याने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर त्याने हे ट्विट करताच त्याच्यावर कौतुकाचा वर्षावही झाल्याचं पाहायला मिळालं. 

Read More