Marathi News> मनोरंजन
Advertisement

आयुष्मान खुरानानं कुटुंबासाठी खरेदी केलं कोट्यवधींचं नवं घर

पाहा कोणत्या भागात त्यानं हे नवं घर खरेदी केलं आहे  

आयुष्मान खुरानानं कुटुंबासाठी खरेदी केलं कोट्यवधींचं नवं घर

नवी दिल्ली : हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेता आयुष्मान खुराना आणि त्याचा भाऊ, अपारशक्ती खुराना यानं त्याच्या कुटुंबाला एक खास भेट दिली आहे. आपल्या कुटुंबाला आयुष्माननं एक आलिशान घर भेट स्वरुपात दिलं आहे. पंचकुला भागात त्यानं हे नवं घर खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे. त्याच्या या घराची किंमत तब्बल 9 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. शहरी धकाधकीपासून दूर अतिशय उच्चभ्रू अशा वस्तीमध्ये आयुष्यमानचं हे घर आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार आयुष्मानच्या या कुटुंबात आई- वडिल पूनम आणि पी. खुराना, खुद्द आयुष्मान आणि त्याची पत्नी ताहिरा कश्य, भाऊ अपारशक्ती खुराना आणि त्याची पत्नी आकृती यांचा समावेश आहे. खुराना कुटुंबीयांनी चंदीगढमधील सॅटेलाईट टाऊन येथे या नव्या घराची खरेदी केली. 

आपल्या या नव्या घराविषयी सांगताना आयुष्यमान म्हणाला, 'खुराना कुटुंबाला आता त्यांच्या कुटुंबाचं हक्काचं घर सापडलं आहे. संपूर्ण कुटुंबानंच हे घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या घरात संपूर्ण खुराना कुटुंब राहू शकतं. आमच्या या नव्या पत्त्यावर खुप साऱ्या आठवणींसाठी आम्ही प्रतिक्षेत आहोत'. 

 
 
 
 

A post shared by Aparshakti Khurana (@aparshakti_khurana) on

 

गेल्या बऱ्याच काळापासून खुराना कुटुंबीय एका मोठ्या घराच्या शोधात होतं. ज्यामध्ये ते सर्वजण राहू शकतील. आयुष्मानच्या वडिलांच्या मते त्यांची दोन्ही मुलांची आता लग्न झाली आहेत. सोबतच ताहिरा आणि आयुष्मान यांना दोन मुलंही आहेत. त्यामुळं या घडीला त्यांच्या कुटुंबानं एखाद्या मोठ्या घरामध्ये गुंतवणूक करणं योग्य होतं. त्यांनी नुकतंच हे घर खरेदी केलं आहे. तिथे राहण्यासाठी जाण्यास त्यांना वेळ लागू शकतो. आयुष्माननं ज्या भागात घर खरेदी केलं आहे, तेथे मोठे व्यावसायिक, आयएएस अधिकारी, आयपीएस अधिकारी वास्तव्यास असल्याचं म्हटलं जात आहे. 

 

Read More