Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मी गरोदर होते आणि तो ऑनस्क्रीन रोमान्स करत होता....'

इंटिमेट दृश्यांविषयी लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी म्हणते...   

'मी गरोदर होते आणि तो ऑनस्क्रीन रोमान्स करत होता....'

मुंबई : हिंदी कलाविश्वात सेलिब्रिटींच्या जीवनाविषयी चाहत्यांना कायमच कुतूहल वाटत असतं. काही सेलिब्रिटी जोड्या तर अनेकांसाठी आदर्शस्थानीच असतात. अशीच एक जोडी म्हणजे आयुष्मान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप. 

जवळपास १२ वर्षांच्या त्यांच्या या नात्यामध्ये अनेक चढ- उतार आले पण, याच वळणांना ओलांडत या जोडीनं एकमेकांची साथ देणं कायम ठेवलं. आयुष्यमान गेल्या काही काळापासून त्याच्या चित्रपटांच्या माध्यमातून घवघवीत यश संपादन करत आहे. पण, त्याच्या चित्रपटातील इंटिमेट दृश्यांनी मात्र अनेकदा ताहिरावर काही परिणाम झाले होते. 

'पिंकव्हिला'शी संवाद साधताना तिनं याबाबतची माहिती दिली. 

चित्रपटांमध्ये पती साकारत असणाऱ्या इंटिमेट दृश्याविषयी सांगताना ताहिरा म्हणाली, 'हे विकी डोनरपासून सुरु झालं. मी गरोदर होते. मी त्यावेळी घरीच होते. एखाद्या देवमाशाप्रमाणे मी दिसत होते. माझं जवळपास २० किलो वजन वाढलं होतं. प्रत्येक महिलेला या प्रवासाचा अनुभव येतो. मला त्यावेळी असंच वाटायचं, की मी गरोदर, ही अशी दिसतेय आणि माझा पती तिथे दुसऱ्या ऑनस्क्रीन रोमान्स करतो. माझी ही प्रतिक्रिया अगदी अपरिपक्व होती. पण, मला त्याचा काही खेद नाही'. 

आपल्याला अनेकदा insecurity सुद्धा वाटल्याचं तिनं सांगितलं. 'नौटंकी साला' या चित्रपटाच्या वेळी आयुष्माननं ऑनस्क्रीन सर्वाधिक दीर्घ चुंबनदृश्य अर्थात किसिंग सीन दिला होता. ही माहिती माध्यमांमध्ये आली आणि माझ्यापर्यंतही पोहोचली होती असं म्हणत तिनं काही प्रसंग सर्वांपुढे ठेवले. 

fallbacks

 

एकेकाळी असं काहीतरी वागणारी ताहिरा आता मात्र मी पुरती बदलली आहे, हे स्वत: सांगते. याचसंबंधीचं उदाहरण देताना 'अंधाधुन' या चित्रपटाच्या वेळचा प्रसंग तिनं सांगितला. जेव्हा राधिका आणि आयुष्मानमधील लव्ह मेकिंगचं दृश्य आणखी काही वेळासाठी ठेवता आलं असतं... असा सल्लाही तिनं चित्रपटाच्या दिग्दर्शकांना दिला होता. आता आपम या गोष्टींकडे कलेच्या नजरेतून पाहतो ही बाब तिनं न विसरता स्पष्ट केली. 

Read More