Marathi News> मनोरंजन
Advertisement

Tongue Twister Challenge : महानायकाला जमलं नाही; तुम्हाला पाहा जमतंय का?

बिग बींकडून चाहत्यांसाठी जबरदस्त चॅलेंज..

Tongue Twister Challenge : महानायकाला जमलं नाही; तुम्हाला पाहा जमतंय का?

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असतात. बिग बी अनेकदा ट्विटरवरुन, इन्स्टाग्रामवरुन अनेक मनोरंजनात्मक व्हिडिओ, फोटो शेअर करत असतात. आता बिग बींनी चाहत्यांना एक जबरदस्त चॅलेंज दिलं आहे. अमिताभ बच्चन यांनी एक टंग ट्विस्टर डायलॉग बोलण्याचं चॅलेंज केलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बिग बी त्यांच्या आगामी 'गुलाबो सिताबो'शी संबंधित एक टंग ट्विस्टर डायलॉग बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. बिग बी हा डायलॉग चाहत्यांनाही 5 वेळा बोलण्यासाठी चॅलेंज करत आहेत. 

दरम्यान, अमिताभ बच्चन यांचा आगामी गुलाबो सिताबो चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर 12 जून रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराना यांची प्रमुख भूमिका आहे. याआधी अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराना यांनी पिकू आणि विकी डोनर या चित्रपटात काम केलं आहे. 

Read More