Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : अभिनयासोबतच रिक्षाही चालवते 'ही' अभिनेत्री, बोमन इराणी यांनी शेअर केला व्हिडिओ

ती मराठी मालिकांमध्ये काम करते... 

VIDEO : अभिनयासोबतच रिक्षाही चालवते 'ही' अभिनेत्री, बोमन इराणी यांनी शेअर केला व्हिडिओ

मुंबई : असंख्य स्वप्नांच्या बळावर मायानगरी मुंबईत कित्येकांची जडणघडण सुरू असते. कोणाच्या वाट्याला यश अगदी सहजपणे येतं, तर कोणाला यासाठी संघर्ष करावा लागते या परिस्थितीमध्ये काही व्यक्तींच्या वाट्याला येणारा संघर्ष हा इतरांसाठी प्रेरणास्त्रोत ठरतो. सध्या असाच प्रेरणास्त्रोत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे, त्याला कारण ठरत आहे एक व्हिडिओ. बॉलिवूड अभिनेते बोमन इराणी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

इराणी यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअकर केला असून, त्यासोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी आपल्या अनोख्या रिक्षा सफरीविषयी माहिती दिली आहे. 'आज या एका अद्वितीय महिलेला भेटलो. ती मराठी मालिकांमध्ये काम करते आणि ती एक रिक्षाही चालवते', अशी माहिती त्यांनी या कॅप्शनमध्ये लिहिली. लक्ष्मी ही एक प्रकारे इतरांसाठी प्रेरणास्त्रोतच आहे, खऱ्या अर्थाने ती एक हिरो ठरत आहे असं म्हणत त्यांनी तिचं कौतुक केल्याचंही पाहायला मिळालं. 

fallbacks

तुम्हा सर्वांनाही तिच्या रिक्षांमध्ये बसण्याची संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त करत त्यांनी लक्ष्मीच्या उत्साहाची आणि तिच्या परिश्रमांची दाद दिली. सोबतच पुढील वाटचालीसाठी तिला खुप साऱ्या शुभेच्छाही दिल्या. इराणींचा हा अंदाज कोणासाठी नवा नाही. पण, लक्ष्मीसाठी तो नक्कीच पूर्णपणे नवा आणइ अनपेक्षित ठरला. कारण, आपल्या वाहनातून प्रवास करणाऱ्या इराणी यांच्या शेजारूनच लक्ष्मीची रिक्षा जात होती. त्यावेळी त्यांना पाहून तिच्या रिक्षातील व्यक्तींनी इराणींसोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनीही चाहत्यांना नकार दिला नाही. यावेळी इराणी मात्र लक्ष्मीच्या कर्तृत्वाने भारावले आणि तिच्यासोबतचाच एक लहानसा व्हिडिओ त्यांनी स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. यामुळे लक्ष्मीही फार आनंदात दिसलीच. त्यासोबतच तिच्या कामाची माहितीही अनेकांनाच मिळाली, असं म्हणायला हरकत नाही. 

Read More