Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' व्यक्तीमुळं हृतिकच्या आयुष्यात आली सबा

एका हॉटेलमधून बाहेर येताना छायाचित्रकारांच्या कचाट्यात सापडली 

'या' व्यक्तीमुळं हृतिकच्या आयुष्यात आली सबा

मुंबई : अभिनेता हृतिक रोशन हा कायमच त्याची स्टाईल, त्याचे आगामी चित्रपट, काहीच नाही तर त्याची Ex Wife सुझॅन खान यांच्यामुळं चर्चेत असतो. पण, आता म्हणे हाच हृतिक चर्चेत आला आहे एका दुसऱ्याच महिलेमुळे. ही महिला सुझॅन नसून, ती आहे त्याची कथित प्रेयसी. (hritik sroshan saba azad)

सबा आझाद, असं बॉलिवूडच्या ग्रीक गॉडच्या गर्लफ्रेंडचं नाव. नुकतंच ही जोडी एका हॉटेलमधून बाहेर येताना छायाचित्रकारांच्या कचाट्यात सापडली . ज्यानंतर त्यांचे बरेच फोटो व्हायरल झाले. 

सबा म्युझिशियन असण्यासोबतच एक अभिनेत्रीही आहे. तिनं बऱ्याच बॉलिवूडपटांमध्ये काम केलं आहे. पण, हे चित्रपट फारशी चांगली कामगिरी करु शकले नाहीत. 

'दिल कबड्डी' या चित्रपटातून ती 2008 मध्ये बॉलिवूडमध्ये आली. सूत्रांच्या माहितीनुसार हृतिक आणि तिची भेट दोघांच्याही एका मित्रानं केली होती. आता हा मित्र किंवा ही खास मैत्रीण कोण याचा खुलासा मात्र झालेला नाही. 

पण, असं म्हटलं जातं की पहिल्या भेटीनंतर हृतिक आणि सबा एकमेकांच्या संपर्कात राहिले. पुढे अर्थातच गप्पागोष्टी वाढल्या असणार. 

यांचं नातं तेव्हा लक्ष वेधून गेलं जेव्हा एका हॉटेलबाहेर अतिशय निर्धास्तपणे ते एकमेकांचा हात पकडून दिसले. 

fallbacks

या भेटीत त्यांनी कामाबाबत चर्चा केल्याचंही सांगितलं गेलं. आता मुद्दा असा की, खरंच ही जोडी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केव्हा करणार ? 

Read More