Jeetendra Land : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जितेंद्र कपूर हे चित्रपटसृष्टीपासून लांब असले तरी ते त्यांच्या खासगी आयुष्याला घेऊन चर्चेत आहेत. सध्या ते त्यांच्या जमिनीला घेऊन चर्चेत आहेत. अशी माहिती समोर आली आहे की त्यांनी नुकतीच अंधेरीत असलेली त्यांची प्रॉपर्टी विकली आहे. जमिनीचा व्यवहार हा मे 2025 मध्ये झाला आहे. त्यामुळे जितेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाला कोटींचा फायदा झाला आहे. त्यांची ही जमीन कोणत्या कंपनीनं खरेदी केली त्याविषयी जाणून घेऊया.
सीएनबीसी टीव्ही18 च्या एका रिपोर्टनुसार जितेंद्र यांनी त्यांची अंधेरीच्या प्रॉपर्टीचा हा व्यवहार 855 कोटींमध्ये केला. ही जमीन जितेंद्र यांचा मुलगा आणि अभिनेता तुषार कपूर आणि कपूर कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे असलेली जमीन त्यांनी आता विकली आहे. जमिनिच्या या व्यवहारासाठी 8.69 कोटींची स्टॅम्प ड्यूटी आणि 30000 रुपये पंजीकरण फी आकारली आहे.
जितेंद्र आणि त्यांच्यां कुटुंबानं ही प्रॉपर्टी एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स अॅन्ड क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला विकली आहे. या कंपनीनं 855 कोटी देत ती जमीन त्यांच्या नावी केली आहे. ही कंपनी आधी नेटमॅजिक आयटी सर्विसेज प्रायव्हेट लिमिटेड या नावानं ओळखली जाते. ही प्रॉपर्टी सध्या बालाजी आयटी पार्कमध्ये आहे आणि यात तीन इमारती आहेत. ही जमीन एकूण 45,572.14 स्क्वेअर मीटरची आहे.
जितेंद्र यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्यांनी 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गीत गाया पत्थरों ने’ सुरु केला होता. तुम्हाला ही माहिती मिळाल्यानंतर आश्चर्य होईल की त्यांना सगळ्यात आधी 100 रुपये मानधन मिळालं होतं. त्यांचा तो चित्रपट फ्लॉप ठरला होता. तर त्यानंतर 1967 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फर्ज’ या चित्रपटातून खरं यश मिळालं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ते लोकप्रिय अभिनेते ठरले. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ज्यात ‘हिम्मतवाला’, ‘थानेदार’, ‘खुदगर्ज’, ‘तोहफा’, ‘मवाली’, ‘फर्ज और कानून’, ‘आशा’, ‘जीने की राह’, ‘धरमवीर’, आणि 'कारवां’ चित्रपट आहेत.