Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नासाठी तयार नाही, म्हणताच साराचा कार्तिकला सवाल

त्याचा नकारार्थी सूर ऐकताच ती अशी काही व्यक्त झाली की.....

लग्नासाठी तयार नाही, म्हणताच साराचा कार्तिकला सवाल

मुंबई : सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान आणि कलाविश्वात फार कमी वेळात यशशिखरावर पोहोचणाऱ्या अभिनेता कार्तिक आर्यनविषयी बी- टाऊनमध्ये बऱ्याच चर्चांनी जोर धरला आहे. त्यांच्या नात्यात उडणारे खटके, माध्यमांमध्ये परसणारी ही चर्चा आता एका भलत्याच वळणावर आली आहे. 

नात्याविषयी होणाऱ्या याच चर्चांदरम्यान कार्तिक आणि सारा हे दोघंही त्यांच्या 'लव्ह आज कल' या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहेत. यामध्येच त्यांनी नुकतीच 'इंडियन आयडॉल' या रिअॅलिटी शोच्या मंचावर हजेरी लावली होती. याच मंचावर कार्तिकला लग्नाविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याचं उत्तर ऐकत साराने त्याला मध्येच रोखलं आणि प्रतिप्रश्न केला. 

'मुंबई मिरर'च्या वृत्तानुसार सारा आणि कार्तिकमध्ये या कार्यक्रमादरम्यान, 'ट्रुथ ऑन द शो' असा प्रश्न विचारण्यात आला. यातच आपण सध्यातरी लग्नासाठी तयार नसल्याचा खुलासा त्याने केला. कार्तिकचं हे बोलणं ऐकत लगेचच साराने यावर प्रतिक्रिया दिली. 'तू रिलेशनशिपसाठी तयार आहेस. पण, लग्नासाठी नाही?', असा प्रतिप्रश्न साराने केला. इतक्यावरच न थांबता त्याने आपण, अशा प्रकारच्या नात्यात पूर्वाश्रमीच्या प्रेयसीशी पुढे जाऊन मैत्री ठेऊ शकत नाही, ही बाबही त्याने स्पष्ट केली. तर, साराचं मत मात्र त्याच्या पूर्णपणे विरोधातील ठरलं. 

वाचा : आतातरी माझं वय कमी करा; ज्येष्ठ अभिनेत्रीचा गुगलकडे आग्रह

 

अतिशय मजामस्तीच्या वातावरणात पार पडलेल्या या भागामध्ये कार्तिक साराचा हा दिलखुलास संवाद उपस्थितांना अनुभवता आला. चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर येत आहे. तेव्हा आता त्यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीप्रमाणेच ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांची मनं जिंकते का हे पाहणं औत्सुत्याचं 

Read More