Marathi News> मनोरंजन
Advertisement

Nana Patekar son Malhar Patekar: नानांचं लेकाशी मैत्रीचं नातं; पाहा 'तो' सध्या काय करतो

मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या या अभिनेत्यानं कायमच प्रेक्षकांना थक्क केलं आहे.   

Nana Patekar son Malhar Patekar: नानांचं लेकाशी मैत्रीचं नातं; पाहा 'तो' सध्या काय करतो

मुंबई : भारतीय चित्रपट जगतामध्ये काही कलाकारंच्या नावांना कायमच लोकप्रियता मिळते. अशा नावांपैकी एक म्हणजे अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar). मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या या अभिनेत्यानं कायमच प्रेक्षकांना थक्क केलं आहे. 

रुपेरी पडदा असो किंवा मग प्रत्यक्ष आयुष्य. नानांनी कायमच पाऊल टाकलं ते क्षेत्र गाजवलं. अगदी समाजसेवेतही ते मागे नाहीत. अशा या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याचं चाहत्यांना विशेष कौतुक. 

नानांचं कुटुंब फार प्रकाशझोतात येत नाही. त्यांचा मुलगा मल्हार मात्र या न त्या कारणाने कायमच चर्चेत असतो. त्यानंही आपल्या वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकलं आहे. (Bollywood Actor Nana Patekar Malhar Patekar relationship bio lifestyle)

मल्हारला पशुपक्षांवर विषेश प्रेम
मल्हार पाटेकर (Malhar Patekar) ला पशुपक्षांवर विशेष प्रेम. अनेकदा मुक्या प्राण्यांना पक्षांना चारा- पाणी देताना त्याला पाहायला मिळतं. फिरण्याची आवड असणारा मल्हार पक्का खवैय्याही आहे. 

कदाचित तुम्हाला ठाऊ नसेल. पण, मल्हारचा एक मोठा भाऊसुद्धा होता. अवघ्या 2 वर्षांच्या वयातच त्यानं आजारपणामुळं जगाचा निरोप घेतला. मुलाच्या निधनाचा आघात नाना आणि त्यांची पत्नी नीलकांती यांच्यावरही झाला होता. पण, मल्हारच्या जन्मानंतर मात्र परिस्थिती बदलली. 

नाना आणि त्यांची पत्नी विभक्त राहतात. त्यांचा घटस्फोट झालेला नाही. मल्हार त्याच्या वडिलांच्या तुलनेत आईच्या अधिक जवळ आहे. मल्हार फिलांथ्रोपिस्ट असून, तो नाम फाऊंडेशनच्या कामातही हातभार लावतो. 

2013 मध्ये 'गॉडफादर' या चित्रपटात त्यानं लहानशी भूमिका साकारली होती. 26/11  या चित्रपटाच्या दिग्दर्शनातही तो सहायक दिग्दर्शक म्हणून कार्यरत होता. सध्या तो नाना साहेब प्रोडक्शन हाउसमध्ये निर्मात्याची भूमिका साकारताना दिसत आहे. 

Read More