Marathi News> मनोरंजन
Advertisement

कॅज्युअल सेक्स, वन नाईट स्टँड Is Ok, मी हे सर्व अनुभवलंय; लोकप्रिय अभिनेत्रीच्या मुलाची कबुली

सेक्स आणि रिलेशनशिपच्या बोल्ड आणि तितक्याच मॉ़डर्न अंदाजावर भर

कॅज्युअल सेक्स, वन नाईट स्टँड Is Ok, मी हे सर्व अनुभवलंय; लोकप्रिय अभिनेत्रीच्या मुलाची कबुली

मुंबई : बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बर (Prateik Bababr Web Series)  हा कायमच त्याच्या वेगळ्या अंदाजासाठी चर्चेत असतो. येत्या काही दिवसांमध्ये प्रतीक ‘हिकअप्स एंड हुकअप्स’ (Hiccups & Hookups) या सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यासाठी तो सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. 

अभिनेत्री लारा दत्ता या सीरिजमध्ये प्रतीकच्या बहिणीच्या भूमिकेत झळकणार आहे. सीरिजमध्ये सेक्स आणि रिलेशनशिपच्या बोल्ड आणि तितक्याच मॉ़डर्न अंदाजावर भर देण्यात आला आहे. 

सीरिजच्याच निमित्तानं खुद्द प्रतीकनं आपण आपल्या खऱ्या आयुष्यात बहिणीशी अगदी कोणत्याही मुद्द्यावर गप्पा मारु शकतो असं सांगितलं. 

आपण सेक्समध्ये काही गैर मानत नसल्याचं त्यानं एका मुलाखतीत स्पष्ट केलं. जे लोक प्रेमात विश्वास ठेवत नाहीत, ते कॅज्युअल सेक्समध्ये विश्वास ठेवतात. 

'मी स्वत: कॅज्युअल सेक्स ट्राय केला आहे. मला वाटतं की सर्वजण यातून केव्हा न केव्हा जातात. वन नाईट स्टँड, फ्लिंग, हुकअप्स... मी या साऱ्यातून गेलोय', असं प्रतीक म्हणाला. 

कुटुंबामध्ये जेव्हा आपण सेक्ससारख्या न्यूनगंड असणआऱ्या विषयांवर बोलतो त्यावेळीच आपल्यातील नात्यांचे बंधही वाढतात असं प्रतीकनं स्पष्ट केलं. 

प्रतीक बब्बरचं त्याच्या बहिणीशी खास नातं आहे. बहीण आपल्याला विविध मुद्द्यावर सल्ले देते, मार्गदर्शनही करते असं सांगत प्रतीकनं बहिणीसोबतचं नातं सर्वांसमोर ठेवलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by prateik babbar (@_prat)

अनेकदा सेक्स आणि त्याच्याशी संबंधीत मुद्द्यांवर बोलण्यास संकोचलेपणा वाटतो. पण, सध्या बऱ्याच कलाकृतींच्या माध्यमातून हा विषय अगदी सहजपणे हाताळला जात असताना दिसत आहे. 

Read More