Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नानंतर लगेचच पत्रलेखा, राजकुमारमध्ये दुरावा; कारण वाचणाऱ्यांना बसतोय धक्का

राजकुमार आणि त्याची पत्नी मुंबईत परतले आहेत. पण... 

लग्नानंतर लगेचच पत्रलेखा, राजकुमारमध्ये दुरावा; कारण वाचणाऱ्यांना बसतोय धक्का

मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेता राजकुमार आणि अभिनेत्री पत्रलेखा पॉल यांनी लग्नगाठ बांधली. अतिशय दिमाखदार सोहळ्यात ही जोडी लग्नबंधनात अडकली. जिथं मोजक्या पण, खास पाहुण्यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती.

विवाहसोहळा आटोपून, काही निवांत क्षण व्यतीत केल्यानंतर आता राजकुमार आणि त्याची पत्नी मुंबईत परतले आहेत. पण, म्हणे लग्नानंतरच त्यांच्यात दुरावाही आला आहे. 

आता तुम्ही म्हणाल, इतक्या लगेचच कसा आणि का आला दुरावा? तर, इथं दुरावा हा गंभीर अर्थानं नाही. 

राजकुमार त्याच्या आगामी, अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'भीड' या चित्रपटासाठी कामावर रुजू होत आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार नोव्हेंबर- डिसेंबरमध्येच सिन्हांच्या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु करण्याची योजना होती. राजकुमारनंही यासाठी सहमती दिली होती. 

म्हणूनच राजकुमार आणि पत्रलेखानं आताच लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरुन हनिमूनसाठी जाण्यापूर्वी राजकुमार चित्रीकरण पूर्ण करु शकेल. 

'भीड़' (Bheed) या चित्रपटाचं चित्रीकरण बहुतांश लखनऊ येथे करण्यात येणार आहे. या चित्रपटासाठी राजकुमार फारच उत्साही आहे. त्यातच आता लग्नही झाल्यामुळं तो नव्या जोमानं या चित्रपटाच्या कामाला लागणार आहे. 

चित्रीकरणात पुन्हा रुजू होणार असल्यामुळे राजकुमार अर्थातच काही दिवसांसाठी पत्रलेखापासून दूर जाणार आहे. पण, हा दुरावा काही दिवसांचाच आहे हेसुद्धा तितकंच खरं. 

Read More