Marathi News> मनोरंजन
Advertisement

सवी सिद्धूंच्या मदतीसाठी बॉलिवूड अभिनेत्याचा पुढाकार

सवी यांना धीर देण्यासाठी आणि काही मार्गाने मदत करण्यासाठीच अनेकांनी प्रयत्न केला. 

सवी सिद्धूंच्या मदतीसाठी बॉलिवूड अभिनेत्याचा पुढाकार

मुंबई : अभिनेता सवी सिद्धू यांनी नाइलाजास्तव स्वीकारलेल्या सुरक्षा रक्षकाच्या नोकरीविषयी आणि त्यांच्या आयुष्यातील या अडचणीच्या काळाविषयी माहिती मिळताच आता कलाविश्व त्यांच्या मदतीसाठी उभं राहिल्याचं पाहायला मिळत आहे. अनुराग कश्यप मागोमाग आता अभिनेता राजकुमार रावसुद्धा सवी  यांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्याने सवी यांना धीर दिला. 'गुलाल', 'पटियाला हाऊस', 'पाँच', 'ब्लॅक फ्रायडे' या चित्रपटांमध्ये झळकलेल्या सवी सिद्धू यांच्याविषयीची माहिती आणि त्यांच्यावर आलेल्या अडचणीच्या प्रसंगाचा खुलासा काही दिवसांपूर्वीच फिल्म कम्पॅनियन हिंदीकडून करण्यात आला होता. त्यानंतर सवी यांना धीर देण्यासाठी आणि काही मार्गाने मदत करण्यासाठीच अनेकांनी प्रयत्न केला. 

तुमच्या कहाणीने खुप प्रेरणा मिळाली. तुमच्या कामाचं काम आणि चित्रपट हे नेहमीच प्रशंसनीय ठरले आहेत. तुमची सकारात्मकता मला फारच आवडली आहे, असं राजकुमार म्हणला. सोबतच आपण कलाविश्वातील आपल्या मित्रांना तुमच्यापर्यंत पोहोचण्याची नक्की विचारणा करु, असी हमीही त्याने सवी यांना दिली. 

fallbacks

एखाद्या गोष्टीप्रती असणारी जिद्द, चिकाटी याच गोष्टी अडथळे दूर करण्यासाठी फायद्याच्या ठरतात, असं राजकुमारने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं. सवी यांच्यापर्यंत आता ही मदत कधी आणि केव्हा पोहोचणार हा प्रश्न कायम आहे. पण, तरीही एखाद्या कलाकाराविषयी माहिती मिळताच ज्या प्रकारे त्याला शक्य त्या मार्गांनी मदत करत एका सच्चा कलाकाराला पुन्हा उभं राहण्यासाठी आणि कलाविश्वातील त्याचं स्थान परत मिळवून देण्यासाठी काही प्रसिद्ध चेहऱ्यांची ध़डपड ही त्यांचं मोठेपण दाखवत आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.  

 

Read More