Marathi News> मनोरंजन
Advertisement

...त्यात गैर काय? घरी काम न करणाऱ्या पुरुषांनो, पाहा या अभिनेत्याला

तू घरात काम करतोस का? 

...त्यात गैर काय? घरी काम न करणाऱ्या पुरुषांनो, पाहा या अभिनेत्याला

मुंबई : तू घरात काम करतोस का? असं विचारलं असता काहीजणं नकारार्थी उत्तर देतता. असं का? हा प्रतिप्रश्न केला असता त्यांच्याकडे याचं उत्तर मात्र नसतं. मुळात एखादी स्त्री घरातल्या कामाचा भार तिच्या खांद्यांवर घेत असेल तर पुरुषानं तिला मदत करण्यात गैर काहीच नाही ही बाब स्वीकारणं महत्त्वाचं. 

आज असे अनेक पुरुष आहेत जे आपल्या घरातील महिलांना, मग ती आई असो, पत्नी, मुलगी असो किंवा मग बहीण असो. त्या सर्वांनाच मदत करताना दिसतात. या पुरुषांचं खरंच कौतुक करावं. कारण, घरकामात स्त्रीला मदत करण्यात गैर ते काय, अशीच त्यांची भूमिका असते. 

बॉलिवूडमध्येही असा एक अभिनेता आहे, जो त्याच्या चित्रपटांतून तर चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतच असतो. पण, सोबतच तो त्याच्या वागण्यानंही सर्वांचीच मनं जिंकत आहे. यावेळी ज्या कृत्यामुळे तो चर्चेत आला आहे, ते कृत्य म्हणजे घरकामात मदत करण्याचं. (Bollywood Actor RajKummar Rao do Household Chores heplps wife patralekha)

हा अभिनेता आहे, राजकुमार राव. गेल्या वर्षीच राजकुमारनं प्रेयसी पत्रलेखाशी लग्नगाठ बांधली. एका मुलाखतीदरम्यान, त्यानं आपण या नात्यात जबाबदाऱ्या वाटून घेत असल्याचं सांगितलं. आपल्याला ओसीडी आहे, त्यामुळं घरातील वस्तू स्वच्छ ठेवण्यावर माझा भर असतो, असं त्यानं सांगितलं.

fallbacks

पत्रलेखाला मी घरातल्या कामांमध्ये मदत करतो, असं सांगताना राजकुमारनं सर्वांचीच मनं जिंकली. भांडी स्वच्छ करणं, फरशी स्वच्छ करणं, केरसुणी मारणं ही सर्व कामं आपल्या आवडीची असल्याचंही त्यांनं सांगितलं. लहानपणी आईला या कामांत मदत केल्यामुळं त्याबाबतची आवड आपोआपच निर्माण झाल्याचंही तो म्हणाला. 

राजकुमारची ही कृती पाहता, त्यानं तर अनेकांची आणि विशेष म्हणजे अनेक जणींचीच मनं जिंकली. पण, तुमचं काय? करणार ना घरकामांमध्ये मदत ? 

Read More