Marathi News> मनोरंजन
Advertisement

आलिया- रणबीरचं गुपचूप शुभमंगल? फोटो व्हायरल

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या नात्याविषयीची गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. 

आलिया- रणबीरचं गुपचूप शुभमंगल? फोटो व्हायरल

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या नात्याविषयीची गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. मुख्य म्हणजे हे दोघंही त्यांच्या नात्याविषयी कोणतीही बाब लपवून ठेवताना दिसत नाहीत. कुटुंबासोबत वेळ व्यतीत करणं असो, किंवा मग एखाद्या समारंभाला हजेरी लावणं असो, आलिया आणि रणबीर अनेकदा एतत्रच पाहिले जातात. अशी ही सर्वांचीच लाडकी जोडी, लग्नाच्या बंधनात अडकल्याच्या चर्चा सुरु आहेत. या चर्चांना निमित्त ठरत आहे, ते म्हणजे व्हायरल होणारा एक व्हिडिओ. 

एकिकडे 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करणारी ही जोडी व्हायरल फोटोंमुळे चांगलीच लक्ष वेधत आहे. ज्यामध्ये हे दोघंही वधू- वराच्या रुपात दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदही पाहण्याजोगा आहे. एकमेकांकडे पाहता त्यांच्या मनातील भावना, एकमेकांप्रती आणि या नात्याप्रती असणारा आदरही व्यक्त होताना दिसत आहे. 

fallbacks

fallbacks

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो खरंच आलिया - रणबीरच्या लग्नसोहळ्यातील आहे का, असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? 'बॉलिवूड लाईफ'च्या वृत्तानुसार हे फोटोशॉपचं एक उदाहरण आहे. या दोन्ही कलाकारांच्या फॅनपेजवरून तो शेअर करण्यात आला ज्यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला. किंबहुना आगामी जाहिरातीसाठी या दोघांनी एकत्र काम केल्याचंही म्हटलं जात आहे. त्यातीलच हा फोटो असल्याचं कळत आहे. त्यामुळे कारण, काहीही असो पण आता आलिया आणि रणबीरच्या लग्नसोहळ्याचीच साऱ्या कलाविश्वाला आणि चाहत्यांना उत्सुकता लागलेली आहे हे खरं. 

Read More