Marathi News> मनोरंजन
Advertisement

पाकिस्तानी मुलीपासून दीपिकापर्यंत; रणबीरच्या 'या' Ex Girlfriend आलियालाही ठाऊक नसतील

काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रणबीर आणि आलियानं लग्नाचा निर्णय घेतला.   

पाकिस्तानी मुलीपासून दीपिकापर्यंत; रणबीरच्या 'या' Ex Girlfriend आलियालाही ठाऊक नसतील

मुंबई : बॉलिवूडमधील अत्यंत प्रतिष्ठीत कुटुंबांपैकी एक असणाऱ्या कपूर कुटुंबात सध्या लगीनघाई सुरु आहे. निमित्त आहे ते म्हणजे अभिनेता रणबीर कपूर याच्या आणि आलिया भट्टच्या लग्नाचं. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रणबीर आणि आलियानं लग्नाचा निर्णय घेतला. (ranbir kapoor Alia bhatt wedding)

fallbacks

पण, तुम्हाला माहितीये का आलियाच्या आधाहीही रणबीर काहीजणींसोबत रिलेशनशिपमध्ये होता. यातली काही नावं तर अशी आहेत ज्याची माहिती आलियालाही नसावी. 

इम्तियाज अली याच्या 'रॉकस्टार' चित्रपटातून रणबीर आणि नर्गिस फख्री यांनी स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतरपासून त्यांच्या नात्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. रणबीर आणि नर्गिक एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी कमाल जोर धरला. 

fallbacks

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिचे आणि रणबीर कपूर याचे न्यू यॉर्कमधील धुम्रपान करतानाचे फोटो सर्वांना हादला देऊन गेले. खरंच यांचं काय सुरुये, हाच प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला होता. 

fallbacks

रणबीरची आणखी एक प्रेयसी म्हणजे कतरिना कैफ. त्यांच्या नात्याविषयी नव्यानं काही सांगण्याची गरज नाही. कारण एक वळण असंही आलं जेव्हा रणबीर आणि कतरिना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

fallbacks

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात रणबीर आणि दीपिका पदुकोण यांनीही एकमेकांना डेट केलं. पण, त्यांच्या नात्याचा शेवट वाईट झाला आणि दोघांनीही वेगळ्या वाटा निवडल्या. 

fallbacks

चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यापूर्वीही रणबीरच्या आयुष्यात 'ती' होती. महाविद्यालयीन दिवसांमध्ये म्हणे तो अवंतिका मलिक हिला डेट करत होता. रणबीरला अवंतिका प्रचंड आवडत होती. 

fallbacks

पण, तिनं अभिनेता इम्रान खानशी लग्न केलं. तिचं हे नातं फार काळ टिकू शकलं नव्हतं. 

Read More