Marathi News> मनोरंजन
Advertisement

आलिया माझी पहिली पत्नी नाही... म्हणत लग्नाच्या तीन वर्षांनंतर रणबीरकडून अनपेक्षित उलगडा; चाहत्यांना धक्का!

Ranbir Kapoor Alia Bhatt : बी टाऊनमधील मोस्ट हॅपनिंग जोडी म्हणून अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्याकडे पाहिलं जातं.   

आलिया माझी पहिली पत्नी नाही... म्हणत लग्नाच्या तीन वर्षांनंतर रणबीरकडून अनपेक्षित उलगडा; चाहत्यांना धक्का!

Ranbir Kapoor Alia Bhatt : हिंदी चित्रपटसृष्टी अर्थात बॉलिवूडमध्ये सुरुवातीपासूनच 'मोस्ट हॅपनिंग कपल' म्हणून कैक जोड्या प्रकाशात आल्या. खासगी जीवनातील जोडप्यांचं नातं, त्यांचं एकमेकांवर असणारं प्रेम आणि चाहत्यांसमोर किंवा अगदी कॅमेरासमोर त्यांचं अगरदी सराईतासारखं वावरणं ही प्रत्येत गोष्ट सर्वांच्याच मनात घर करणारी. अशा या जोडप्यांच्या यादीत काळानुरूप बदल झाले आणि पाहता पाहता या यादीच अभिनेता रणबीर कपूरसह त्याची पत्नी आलिया भट्टला जागा मिळाली. 

रणबीर सध्या पूर्णपणे एक 'फॅमिली मॅन' म्हणूनच कुटुंबाला वेळ देत असून आपल्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीलाही तो तितकंच प्राधान्य देत आहे. अशा या बी टाऊनच्या चॉकलेट बॉयनं 2022 मध्ये अनेक महिला चाहत्यांचा प्रेमभंग करत अभिनेत्री आलिया भट्ट हिच्याशी लग्नगाठ बांधली. अतिशय छोटेखानी पण तितक्याच खास सोहळ्यात या दोघांनी सहजीवनाची वचनं एकमेकांना देऊ केली आणि आता जिथं या लग्नाला तीन वर्ष पूर्ण होत आहेत तिथंच रणबीरनं मात्र आलिया ही आपली पहिली पत्नी नसल्याचा काहीसा अनपेक्षित आणि भुवया उंचावणारा उलगडा केला आहे. 

बसला ना धक्का? 

रणबीरच्या चाहत्यांचा आकडा किती मोठा आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्याची एक झलक पाहण्यासाठी तरुणी प्रचंड गर्दी करतात ही दृश्यसुद्धा नवी नाहीत. याच रणबीरनं 'मॅशेबल इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत एक मोठा खुलासा केला. जिथं त्यानं एक महिला चक्क ब्राह्मणाला घेऊन आली आणि तिनं आपल्या घराच्या गेटपाशी तिथंच लग्न लावपून घेतल्याचं सांगत आपण आजतागायत या आपल्या पहिल्या पत्नीला भेटलो नसल्याचं त्यानं सांगितलं. 

हेसुद्धा वाचा : PHOTO: एकच चित्रपट, तोही शाहरुखसोबत; त्यानंतर कुठेच दिसली नाही 'ही' अभिनेत्री; आज तिचीच संपत्ती 44,250 कोटींवर...

 

'मी याला वेडेपणा म्हणणार नाही कारण अनेकदा याचा वापर चुकीच्या आणि नकारात्मक पद्धतीनं केला जातो. पण, मला आठवतंय की कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये एक मुलगी होती, तिला मी कधीही भेटलो नाही. पण, माझ्या वॉचमननं मला सांगितलं की एक मुलगी आली होती, ब्राह्मणाला घेऊन आणि तिनं गेटवरच लग्न लावून घेतलं. हा तोच बंगला होता जिथं मी माझ्या आईवडिलांसोबत राहत होतो. तिथं गेटवरच काही फुलं आणि कुंकू वगैरे पडलं होतं. त्यावेळी मी शहरात नव्हतो. पण, मला वाटतं हा फारच वेंधळेपणा आहे. मी अद्यापही माझ्या या पहिल्या पत्नीला भेटलो नाही आणि तिला भेटायची मी वाट पाहतोय....(मिश्किल स्वरात)', असं रणबीर म्हणाला. अभिनेत्यानं हा गौप्यस्फोट करताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी बहुविध पद्धतींनी व्यक्त होण्यास सुरुवात केली. आता यावर रणबीरची प्रत्यक्षातील पत्नी, आलिया भट्ट हिची नेमकी काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 

Read More