Marathi News> मनोरंजन
Advertisement

रणबीर कपूरच्या बहिणीवर चोरीचा आरोप

त्याविषयी तिने माफीही मागितली आहे. 

रणबीर कपूरच्या बहिणीवर चोरीचा आरोप

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर याच्या बहिणीवर म्हणडेच ज्वेलरी डिझायनर रिद्धीमा साहनी हिच्यावर एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. एका प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँडच्या डिझाईन्सची चोरी केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच याविषयीची माहिती मिळाली. 

डाएट सब्या नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन  रिद्धीमाने डिझाईन्सची नक्कल केल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. ज्यानंतर तिने इन्स्टाग्रामच्याच माध्यमातून एक पोस्ट लिहिल झाल्या चुकीबद्दल माफी मागितली. 

'आमच्या रिद्धीमा कपूर साहनी ज्वेलरीमध्ये कोणत्याही प्रकारच्या चोरीला, नकलांना प्राधान्य दिलं जात नाही. Mikimoto Kokichi या ब्रँडच्या कर्णफुलांचे फोटो पोस्ट करतेवेळी कलेच्या त्या सुरेख नमुन्यासाठीचं श्रेय त्या कलाकाराला न दिल्यामुळे आम्ही क्षमस्व आहोत. आम्ही प्रत्येक डिझायनरच्या कलात्मकतेचा आदर करतो. त्यासोबतच कधीच आम्ही कोणाच्या डिझाईनची नक्कल करत नाही', असं तिने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आणि आपल्या पेजवरुन त्या कर्णफुलांच्या डिझाईनचा फोटो हटवला. 

रिद्धीमाने लिहिलेली ही पोस्ट आणि आता तिच्या डिझायनर ब्रँडविषयी होणाऱ्या चर्चा पाहता अनेकांनीच यो दोन्ही ब्रँडविषयी जाणून घेण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतल्याचंही पाहायला मिळत आहे. 

Read More