Marathi News> मनोरंजन
Advertisement

Happy Birthday Riteish Deshmukh: रितेशला 'लय भारी' शुभेच्छा देत जेनेलिया म्हणते...

मला अजूनही आठवतंय, १७ वर्षांपूर्वी जेव्हा....

Happy Birthday Riteish Deshmukh: रितेशला 'लय भारी' शुभेच्छा देत जेनेलिया म्हणते...

मुंबई : 'आपला हात भारी.... लाथ भारी... च्या मायला सगळंच लय भारी...' असं म्हटलं की डोळ्यांसमोर एकच चेहरा येतो. तो चेहरा म्हणजे अभिनेता रितेश देशमुख याचा. हिंदी कलाविश्वात हा मराठमोळा चेहरा असा काही प्रसिद्ध झाला की पाहता पाहता त्याने स्वत:चं असं वेगळं स्थान प्रस्थापित केलं. मोठ्या कलाकारांचं प्रस्थ असतानाही बी- टाऊनमध्ये नवी ओळख तयार करण्याचं आव्हान रितेशने लिलया पेललं. 

हिंदीमागोमाग त्याने मराठी चित्रपटसृष्टीतही पदार्पण करत आपल्या मातीशी असणारं सुरेख नातं सर्वांसमोर ठेवलं. अशा या सर्वांच्याच लाडक्या अभिनेत्याचा आज वाढदिवस. रितेशच्या ४० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची पत्नी म्हणजेच अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिने सोशल मीडियावर एक लय भारी पोस्ट लिहित त्याला वाझदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

"मला अजूनही आठवतंय १७ वर्षांपूर्वी जेव्हा 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाच्या सेटवर तुझा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.  वेळ खरंच पाहता पाहता निघून गेली. पण, तुझा वाढदिवस साजरा करण्याची संधी मला नेहमीच मिळाली. हा तोच खास दिवस आहे ज्या दिवशी या जगाला एक खास व्यक्ती भेटली होती. ती व्यक्ती म्हणजे तू...", असं जेनेलियाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं. 

रितेशसोबतचे फोटो पोस्ट करत तिने, त्याचं आपल्या आयुष्यातील स्थान आणि त्याच्यावरील प्रेम व्यक्त केलं. तिने दिलेल्या या शुभेच्छा रितेशसाठी फारच खास असणार यात शंका नाही. जेनेलियाप्रमाणेच असंख्य चाहत्यांनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबातील असूनही कधीच आपल्या क्षेत्रातील वाटचालीसाठी त्याने कधीच या गोष्टीचा वापर केला नाही. उलटपक्षी स्वत:च्याच बळावर अभिनय आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रात त्याने प्रभावी कामगिरी करणं सुरू ठेवलं. अशा या अभिनेत्याला 24tass.com कडूनही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.  

Read More