Marathi News> मनोरंजन
Advertisement

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील अभिनेत्याला ओळखलं का?

कोण आहे 'हा' अभिनेता?   

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील अभिनेत्याला ओळखलं का?

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व गाजवणारा आभिनेता आर माधवनचा एक फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याचा एक वेगळा आणि खास अंदाज त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. फोटो पाहून अनेकांनी त्याचं कौतुक देखील केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील त्याचा फोटो सर्वांचे लक्ष वेधत आहे. चाहत्यांनी माधवनच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

आर माधवनने त्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात दिसत आहे. फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये 'मला आतापर्यंत न मिळालेला रोल. यातील कोणता रोल माझ्यासाठी योग्य आहे आणि कोणता नाही..' असं लिहिलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

दरम्यान, माधवन सध्या त्याच्या आगामी  ‘रॉकेट्राय : नम्बी इफेक्ट’ चित्रपटाच्या कामामध्ये व्यस्त आहे. चित्रपट वैज्ञानिक नम्बी नारायण यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात अभिनेता शाहरूख खान देखील भूमिका साकारणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

चित्रपटात शाहरूख एका पत्रकाराची भूमीका साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 'झिरो' चित्रपटानंतर शाहरूख ‘रॉकेट्राय : नम्बी इफेक्ट’ चित्रपटात झळकणार आहे. त्याचा 'झिरो' चित्रपट रूपेरी पडद्यावर अपयशी ठरला होता. 

Read More