Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्याचं 58 व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न! सप्तपदीनंतर पत्नीसोबत लिपलॉकचा फोटो शेअर करत म्हणाला...

Bollywood Wedding : सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य चाहत्यांसाठी कायमच आकर्षणाचा विषय. अशाच सेलिब्रिटींमधील एका कलाकारानं वयाच्या 58 व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न केलंय. 

अभिनेत्याचं 58 व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न! सप्तपदीनंतर पत्नीसोबत लिपलॉकचा फोटो शेअर करत म्हणाला...

Wedding Video : एखाद्या बॉलिवूड सेलिब्रिटीचं लग्न म्हटलं की त्यामध्ये वऱ्हाडी आणि वाजंत्र्यांचा जितका उत्साह नसतो तितका उत्साह चाहत्यांमध्ये पाहायला मिळतो. एखादा कलाकार लग्न करतोय किंवा कलाकारांचं लग्न झालंय असं समजलं की हा चाहतावर्ग शक्य त्या सर्व परिंनी त्या सेलिब्रिटीविषयी जाणून घेण्याची उत्सुकता दाखवू लागतो. त्यात सध्या बी टाऊनमध्ये लग्नांची रांग लागल्यामुळं चाहत्यांचा उत्साह शिगेला. 

नुकतंच सलमान खानचा भाऊ, अभिनेता अरबाज खान यानं निकाह करत नव्या आयुष्याची सुरुवात केली आणि या सोहळ्याची चर्चा थांबत नाही तोच आणखी एका सेलिब्रिटीच्या लग्नानं नजरा वळवल्या. वयाच्या 58 व्या वर्षी म्हणजेच साठीकडे झुकताना या अभिनेत्यानं तिसऱ्यांना लग्न केलं. या खास क्षणांचा व्हिडीओही त्यानं सोशल मीडियावर शेअर केला जिथं त्याचे पत्नीसोबतचे लिपलॉक करतानाचे फोटोही सर्वांनीच पाहिले. एकमेकांवर नितांत प्रेम करणारी ही सेलिब्रिटी जोडी कोण तुम्हाला माहितीये? 

'मिस्टर बजाज' म्हणून चाहत्यांमध्ये नावलौकिक मिळवलेला हा अभिनेता आहे रोनित रॉय आणि त्यानं जिच्याशी लग्न केलंय, ती वधू आहे त्याचीच पत्नी, नीलम. 25 डिसेंबरला लग्नाच्या 20 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं रोनित आणि नीलम यांनी पुन्हा सात जन्मांची वचनं घेत हे क्षण ते दोघंही नव्यानं जगले. 

हेसुद्धा पाहा : TATA वर विश्वास दाखवल्याचा फायदा! वर्षभरात गुंतवणूकदारांना दुप्पट करुन दिले 'या' शेअर्समधील पैसे

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ronit Roy (@ronitboseroy)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ronit Roy (@ronitboseroy)

अतिशय छोटेखानी तरीही खास असा हा विवाहसोहळा मंदिरात पार पडला. यावेळी कुटुंबीयांची उपस्थिती पाहायला मिळाली. लग्नासाठी रोनितनं पांढरा कुर्ता, गळ्यात छानसा लाल रंगाचा शेला असा लूक केला होता. तर, नीलमनं लाल रंगाच्या ड्रेसला पसंती दिली होती. यावेळी रोनित आणि नीलमचा मुलगा अगस्त्यसुद्धा त्याच्या आईवडिलांच्या लग्नासाठी हजर होता. एखाद्या खास क्षणी पार्टी किंवा इतर पद्धतींनी सेलिब्रेशन करण्यापेक्षा तेच क्षण कैक वर्षांनंतर पुन्हा जगणाऱ्या या जोडीची शक्कल तुम्हाला कशी वाटली? 

Read More