Marathi News> मनोरंजन
Advertisement

ईदच्या निमित्ताने सलमान, शाहरुखच्या घराबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी

या दोन्ही कलाकारांनीसुद्धा चाहत्यांना नाराज केलं नाही 

ईदच्या निमित्ताने सलमान, शाहरुखच्या घराबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी

मुंबई : संपूर्ण देशात बुधवारी ईदचा उत्साह पाहायला मिळाला. प्रत्येकानेच आप्तजनांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये बॉलिवूड कलाकारही मागे राहिले नाहीत. ईदच्या निमित्ताने एखाद्या परंपरेप्रमाणे आभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान यांनी चाहत्यांची एका अनोख्या प्रकारे भेट घेतली. याविषयीचेच व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. 

सलमान खानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या 'गॅलेक्सी अपार्टमेंट' या त्याच्या घराच्या बाल्कनीतून चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्याची आई, सलमा खान आणि वडील सलीम खान हेसुद्धा दिसत आहेत. 'भारत' या चित्रपटामुळे तर, ईदच्या या उत्सवाला चार चाँद लागले. परिणामी सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे सलमान आणि त्याच्या चाहत्यांसाठी हा दिवस जरा जास्तच खास होता.  

 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

एकिकडे सलमानच्या घराबाहेरची ही गर्दी अनेकांचं लक्ष वेधत असतानाच दुसरीकडे तिथूनच काही अंतरावर असणाऱ्या किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान याच्या 'मन्नत' बंगल्याबाहेरही असंच काहीसं दृश्य पाहायला मिळालं. असंख्य चाहते शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले होते. यावेळी तो अबरामसह सर्वांसमोर आला. अबरामनेही आपल्या सेलिब्रिटी बाबांप्रमाणेच हात उंचावत चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. 

 
 
 
 

A post shared by Filmfare (@filmfare) on

शाहरुख 'मन्नत'बाहेरील त्याच्या चाहत्यांसमोर आला असताना आणखी एक व्यक्तीही त्याच्यासोबत दिसली. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असणारा तो चेहरा होता, अमेरिकन टॉक शोचे सुत्रसंचालक डेव्हिड लेटरमन यांचा. सेत्या काळात शाहरुखचा त्यांच्या कार्यक्रमात सहभाग असणार आहे, त्यामुळेच यावेळी त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. एकंदरच या दोन खान मंडळींनी खऱ्या अर्थाने चाहत्यांची भेट घेत त्या अनोखी ईदी दिली, असं म्हणायला हरकत नाही. 

Read More