Marathi News> मनोरंजन
Advertisement

बघतच रहाल...! कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या अभिनेत्रीसोबत सलमानचा ‘तो’ Video Viral

सलमानशी खास नातं असणारी ही सौंदर्यवती आहे तरी कोण ?

बघतच रहाल...! कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या अभिनेत्रीसोबत सलमानचा ‘तो’ Video Viral

मुंबई : अभिनेता सलमान खान यानं कायमच त्याच्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांची मनं जिंकली. गेल्या कित्येक दशकांपासून सलमान त्याच्या चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांशी असणारं खास नातं जपत आहे. म्हणूनच की काय, हे चाहतेही भाईजानच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे तितक्याच गांभीर्यानं पाहत आहेत. परिणामी सलमानच्या लग्नाच्या चर्चांना पुन्हापुन्हा वाव मिळताना दिसत आहे. (Salman khan wedding)

सध्या म्हणे सलमान एका अशा अभिनेत्रीशी जवळीक साधताना दिसतो, जी कायद्याच्या कचाट्यात सापडली होती. व्हायरल व्हिडीओमध्ये लहान मुलांच्या घोळक्यात सलमानसोबत दिसणारी आणि त्याच्याशी खास नातं असणारी ही अभिनेत्री म्हणजे जॅकलिन फर्नांडिस.

नुकतंच सलमान आणि जॅकलिन एका कार्यक्रमाला पोहोचले होते. जिथं त्यांनी लहान मुलांचीही भेट घेतली. सलमान समोर आल्याचं पाहिल्यानंतर जशी प्रत्येकाचीच अवस्था होते, तशीच या मुलांचीही अवस्था झाली होती.

या व्हिडीओचा तसा सलमान आणि जॅकलिनच्या लग्नाशी काहीच संबंध नाही... पण, तरीही थेट त्यांच्या लग्नाच्याच चर्चांना उधाण आलं. कोणी त्याला फक्त लग्न करण्याचा सल्ला दिला, तर कोणी जॅकलिनशी तरी लग्न कर.... असं म्हणत सलमानची फिरकीही घेतली आहे.

मुद्दा असा, की दरवर्षी भाईजान ईदी म्हणून चाहत्यांना काही ना काही भेट देतो. तेव्हा आता ईदच्या आधीच त्याच्याकडे चाहत्यांनी केलेली लग्नाची मागणी पाहता तो लग्नाचा निर्णय घेत सर्वांनाच दणदणीत ईदी देतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, जॅकलिनचं सांगावं तर सध्या ही अभिनेत्री कायद्याच्या कचाट्यात अडकत आहे. सुकेश चंद्रशेखर या महाठगाशी असणाऱ्या नात्यामुळं तिच्यावरही संकटांचं सावट घोंगावताना दिसत आहे. 

Read More