Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमान खानच्या घराचे दरवाजे नेहमी उघडे असतात, कोणीही येऊन घरात..., या अभिनेत्याने केला मोठा खुलासा

सलमान खान गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. अशातच एका अभिनेत्याने सलमानच्या घराशी संबंधित महत्त्वाची माहिती दिली आहे. 

सलमान खानच्या घराचे दरवाजे नेहमी उघडे असतात, कोणीही येऊन घरात..., या अभिनेत्याने केला मोठा खुलासा

Sooraj Pancholi On Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानने इंडस्ट्रीतील अनेक लोकांचे जीवन सुधारले आहे. मात्र, त्या संधीचा फायदा घेऊन कलाकार प्रेक्षकांना किती प्रभावित करू शकतात हे त्यांच्या प्रतिभेवर अवलंबून आहे. यामध्ये करिअरमध्ये सुधारणा करणाऱ्यांच्या यादीत सूरज पंचोलीचे नाव देखील आहे. ज्याने 2015 मध्ये 'हिरो' चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटाची स्वतः सलमान खानने निर्मिती केली होती. 

परंतु, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोणताही चमत्कार करू शकला नाही. मात्र, सूरज अनेकदा सलमान खानचे आभार मानतो. जेव्हा सूरजचा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याच्यावर जिया खान आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप होते. या प्रकरणानंतर जवळजवळ संपूर्ण इंडस्ट्री सूरजपासून दूर गेली होती. परंतु तरीही सलमान त्याच्या पाठीशी उभा राहिला. या गोष्टीचा सूरजवरही खोलवर परिणाम झाला. 

सूरजने पुन्हा एकदा केले सलमानचे कौतुक 

अलीकडेच पुन्हा एकदा सूरज पंचोलीने सलमान खानबद्दलचे प्रेम आणि आदर व्यक्त केला आहे. इंस्टेंट बॉलीवूडला दिलेल्या मुलाखतीत सूरजने म्हटले की, सलमानच्या दयाळूपणा आणि उदारतेमुळे तो इंडस्ट्रीतील सर्वात आदरणीय सेलिब्रिटींपैकी एक बनला आहे. यावेळी सूरजने असेही उघड केले की सलमानचे घर सर्वांसाठी खुले होते. पूर्वी त्याचे घर खरोखरच सर्वांसाठी खुले होते. दाराला कुलूप होते, पण ते कधीही वापरले जात नव्हते.

जर तुम्हाला त्याच्या घरात काही खायचे असेल किंवा फ्रिजमधील कोणतीही गोष्ट घेयची असेल तर तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. इतकच नाही तर तुम्ही सलमान खानचे प्रोटीन शेक किंवा विटामिन देखील घेऊ शकता. कोणी काहीच बोलणार नाही. सूरजने सलमानच्या आदरातिथ्य शैलीचे कौतुक केले. पुढे म्हणाला की, सलमानच्या घरात कोणताही पाहुणा कधीही बाहेरील व्यक्तीसारखा वाटत नाही. अनेकदा असे व्हायचे की सलमान सकाळी उठायचा तेव्हा घरात कोणालाही पाहिलं तर तो विचारायचा की, आरे तुला आला आहे, जेवण केलं का? त्यानंतर कोणालाही त्रास न देता तो त्यांच्या कामात व्यस्त राहायचा. सलमान खानचे घर खरोखरच खूप लहान आहे. 

Read More