Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानच्या भाचीचं घरी जंगी स्वागत; व्हिडिओ व्हायरल

आयुष शर्माने मुलीच्या स्वागताचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

सलमानच्या भाचीचं घरी जंगी स्वागत; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : बॉलिवूड दबंग खान सलमानची बहीण अर्पिताने सलमानच्या वाढदिवशीच २७ डिसेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला. अर्पिताला ३१ डिसेंबरला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. रुग्णालयातून सुट्टी दिल्यानंतर अर्पिता आणि आयुष शर्माच्या मुलीचं त्यांच्या कुटुंबात मोठ्या धूमधामीत स्वागत करण्यात आलं. 

आयुष शर्माने मुलीच्या स्वागताचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अर्पिता आणि आयुष शर्मा यांनी त्यांच्या मुलीचं नाव 'आयत' Ayat असं ठेवलं आहे. 

आयुष शर्माने मुलीचा पहिला फोटोही शेअर केला होता. या सुंदर जगात तुझं स्वागत आहे, असं म्हणत आयुषने त्याच्या मुलीचा आयतचा फोटो पोस्ट केला होता.

सलमाननेही आपल्या भावना व्यक्त करत, आयतच्या स्वागतासह, वाढदिवशी सुंदर गिफ्ट दिल्याबद्दल अर्पिता आणि आयुषचे आभार मानले आहेत. 

३० मार्च २०१६ रोजी अर्पिताने अहिल या तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. आता पुन्हा ते दोघे आई-वडिल झाले आहेत. अर्पिताने २०१४ मध्ये आयुष शर्मासोबत लग्न केलं होतं. 

  

Read More