Somy Ali Exposed Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा केवळ त्याच्या दमदार अभिनयामुळेच नाही तर त्याच्या प्रेम प्रकरणांमुळे देखील सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कॅटरिना कैफ यांसारख्या अनेक अभिनेत्रींशी त्याचे नाव जोडलेले आहे.
रिपोर्टनुसार, मिस वर्ल्ड रहिलेली आणि बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री असलेली ऐश्वर्या रायला डेट करण्यापूर्वी सलमान खान सोमी अली हिच्यासोबत गंभीर नात्यात होता. एवढंच नव्हे तर दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते आणि लवकरच विवाह करणार असल्याचंही बोललं जात होतं. मात्र, अशातच आता सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडने खळबळजनक खुलासा केला आहे.
सलमानच्या एक्स-गर्लफ्रेंडकडून मोठे गौप्यस्फोट
नुकतीच सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने सलमान खानसोबतच 8 वन नाईट स्टँडवर खळबळजनक खुलासा केला आहे. सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने ब्रेकअप झाल्यानंतर अनेक खुलासे केले आहेत. इतकंच नाही तर अनेक जुन्या मुलाखतीत सोमी अली खानने अभिनेता सलमान खानचा अपमान देखील केला आहे. त्यासोबतच तिने सलमान खानवर गैरवर्तन करण्याचा तसेच मारहाण करण्याचा देखील आरोप केला होता.
गेल्या अनेक दिवसांपासून सोमी अली ही सलमान खानबद्दल वेगवेगळे खुलासे करताना दिसत आहे. अशातच तिने सलमान खानचं वैयक्तिक आयुष्य आणि त्याच्यासोबतच्या नात्याबद्दलचा एक खुलासा केलाय. ज्यामध्ये ती म्हणाली की, सलमान खानच्या 8 वन नाईट स्टँडमुळे मी खूप कंटाळले होते. कारण दररोज मला त्याच्या नवीन लफड्याबद्दल ऐकायला मिळायचं. तो मला शिवीगाळ आणि वाईट वागणूक द्यायचा. अपमान देखील करायचा. सलमानला काय हवं होतं ते सहज मिळायचं. अनेक मुली त्याला इंम्प्रेस करायच्या आणि तो मुलींना डोळ्यांनी ऑफर करायचा. सोमी अलीने तिचं शोषण झालेलं असं देखील म्हटलं आहे. तिच्या या विधानानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
कोण आहे सोमी अली?
सोमी अली ही पाकिस्तानी आणि अमेरिकन अभिनेत्री, लेखिका, फिल्ममेकर, मॉडेल आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. तिने काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.2007 पासून ती 'No More Tears' नावाचं एक NGO चालवत आहे. जे अत्याचारग्रस्त महिलांसाठी कार्य करते. 1991 ते 1999 या काळात सलमान आणि सोमी यांचं नातं सुरु होतं. हे नातं सुमारे 8 वर्षं टिकलं. सोमी अलीनेच सलमान खानला पहिल्यांदा प्रपोज केलं होतं आणि तिथूनच त्यांच्या नात्याची सुरुवात झाली होती. 1999 मध्ये त्यांच्या ब्रेकअपनंतर सोमी अली परत अमेरिकेत गेली आणि तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं.