Marathi News> मनोरंजन
Advertisement

Salman Khan च्या मोठ्या भावाच्या पार्टनरनं वेधलं लक्ष, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

अरबाज गेल्या बऱ्याच काळापासून तिला डेट करत आहे 

Salman Khan च्या मोठ्या भावाच्या पार्टनरनं वेधलं लक्ष, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

मुंबई : अभिनेता सलमान खान बोहल्यावर कधी चढणार हा प्रश्न अनेकांच्याच मनात सतत घर करत असतो. आता त्याचं उत्तर खुदद् भाईजानच देऊ शकतो. खान कुटुंबामध्ये येत्या काळात सलमानच्या लग्नाच्या निमित्तानं उत्साह दिसणार की नाही याची स्पष्टोक्ती नाही. पण, त्याचा भाऊ अरबाज खान हा मात्र त्याच्या पार्टनरसोबतच्या नात्याला लवकरच एक नवं वळण देऊ शकतो. 

अरबाज गेल्या बऱ्याच काळापासून जॉर्जिया आंद्रीयानी हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. खान कुटुंबातील अनेक समारंभांमध्ये जॉर्जियानं आजवर हजेरीही लावली आहे. मुख्य म्हणजे अरबाज आणि जॉर्जिया या दोघांनीही या नात्याला सुरेखपणे हाताळलं आहे. अशी ही जोडी येत्या काळात विवाहबंधनात अडकू शकते अशा चर्चांनी जोर धरला आहे. 

एकिकडे जॉर्जियाच्या खान कुटुंबातील एंट्रीची चर्च सुरु असतानाच ती मात्र तिच्या आगामी चित्रपटावर लक्ष देताना दिसत आहे. मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे याच्यासोबत ती 'वेलकम टू बजरंगपुर' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली असून, एका व्हिडीओच्या माध्यमातून याचीच झलकही पाहायला मिळत आहे. 

fallbacks

कोण आहे जॉर्जिया आंद्रीयानी? 
Giorgia Andriani एक इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे. हल्लीच तिनं 'लिटिल स्टार' या म्युझिक व्हिडीओमध्ये शहबाज बदेशासोबत चाहत्यांची मनं जिंकली होती

Read More