Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमान खानने विकलं मुंबईतील घर, घरांची किंमत ऐकून बसेल धक्का

बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता सलमान खानने त्याचे मुंबईमधील वांद्रे येथील अलीशान घर विकलं आहे. 

सलमान खानने विकलं मुंबईतील घर, घरांची किंमत ऐकून बसेल धक्का

Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. ज्यामध्ये तो गेल्या काही महिन्यापूर्वी लॉरेंस बिश्नोई प्रकरणामुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत होता. त्यासोबतच तो त्याच्या अफेअर्स आणि हटके स्टाईलमुळे देखील चर्चेत असतो. 

दरम्यान, सलमान खान आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ते म्हणजे सलमान खानने मुंबईमधील त्याचे वांद्रे येथील अलिशान घर विकल्याची माहिती समोर येत आहे. सलमानच्या या घराची डील ही कोट्यवधी रुपयांमध्ये झाल्याच समोर आलं आहे. हे घर कोणी विकत घेतलं ते आपण जाणून घेऊयात. 

सलमानने विकलं मुंबईतील अपार्टमेंट

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने त्याचे वांद्रेमधील अलिशान अपार्टमेंट विकल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, सलमान खानचे हे अपार्टमेंट वांद्रे पश्चिमेच्या पाली हिल या परिसरात शिव अस्थान हाईट्स येथे होते. सोशल मीडियावर असं म्हटलं जात आहे की, सलमान खानने त्याचे हे अपार्टमेंट 5.35 कोटी रुपयांना विकलं आहे. या अपार्टमेंटमध्ये 122.45 चौरस मीटर जागेसह तीन कार पार्किंगसाठी जागा होती. 

सलमान खानच्या या अपार्टमेंटच्या विक्रीसाठी स्टॅम्प ड्युटी 32.01 लाख रुपये इतकी होती. तर नोंदणी शुल्क 30 हजार रुपये इतके होते. 5.35 कोटी रुपयांना हे घर विकून सलमान खानने मोठी कमाई केली आहे. सलमान खान सध्या त्याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट येथे राहते. तो त्याठिकाणी कुटुंबासह राहतो. अनेक ठिकाणी सलमान खानचे फार्म हाऊस देखील आहेत. ज्यामध्ये पनवेल, लोणावळा या ठिकाणी सलमान खान सुट्टीमध्ये जात असतो. 

लवकरच 'या' चित्रपटात दिसणार सलमान

सलमान खान त्याच्या आगामी चित्रपट 'बॅटल ऑफ गलवान' च्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच त्याने त्याच्या या चित्रपटाची घोषणा केली आहे. सलमानचा शेवटचा चित्रपट 'सिकंदर' होता. हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात गलवान व्हॅलीचा संघर्षाची कथा दाखवण्यात आली होती. 

Read More