Marathi News> मनोरंजन
Advertisement

ना लग्न, ना मुलंबाळं; सलमानच्या 2300 कोटींच्या संपत्तीचं वारसदार कोण?

खुद्द सलमान खान यानंच आपल्या कोट्यवधींच्या संपत्तीचा मालकी हकक् कोणाकडे असणार हे स्पष्ट केलं होतं. 

ना लग्न, ना मुलंबाळं; सलमानच्या 2300 कोटींच्या संपत्तीचं वारसदार कोण?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'दबंग' अभिनेता सलमान खान (Salman Khan) बहुविध कारणांमुळे चर्चेत आला आहे. कुटुंब, चित्रपट, फोटो आणि सर्वाधिक लक्ष वेधणारं कारण ठरलं ते म्हणजे सलमानचं लग्नं. एकाएकी कोणाशी नाव जोडलं गेलं की त्याचा शेवट थेट लग्नाच्याच चर्चांवर येऊन थांबतो. 

प्रत्यक्षात मात्र हा अभिनेता लग्न करण्याच्या कोणत्याही बेतात नाही. आता राहिला प्रश्न सलमानच्या कोट्यवधींच्या संपत्तीचा, तर त्याच्या संपत्ती आणि जमिनजुमल्याचा वारसदार कोण असेल, हा प्रश्नसुद्धा चाहत्यांच्या मनात घर करुन जात आहे. 

जवळपास गेल्या 34 वर्षांपासून सलमान बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. प्रत्येक चित्रपटासाठी तो कोट्यवधींच्या घरात मानधन घेतो. इतकंच नव्हे, तर 100 कोटींहून अधिक कमाई करणारे त्याचे चित्रपट या मानधनात भर टाकण्याचं काम करतात.

सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याच्या एकूण संपत्ती, कमाईचा आकडा 2300 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 

कोणाच्या नावे करणार सर्व संपत्ती? 
असं म्हटलं जातं की खुद्द सलमान खान यानंच आपल्या कोट्यवधींच्या संपत्तीचा मालकी हकक् कोणाकडे असणार हे स्पष्ट केलं होतं. 

साधारण दोन वर्षांपूर्वीच्या मुलाखतीत त्यानं ही बाब सांगितली होती. 'मी लग्न करेन अथवा करणारही नाही. माझ्या निधनापश्चात माझ्या संपत्तीचा अर्धा भाग धर्मदाय संस्थेला दान करण्यात येईल', असं तो म्हणाला होता. 

आपण लग्न न केल्यास संपूर्ण संपत्ती ही सेवाभावी संस्थेलाच दान स्वरुपात देण्यात येणार आहे. 

सलमान फक्त अभिनयासाठीच नाही, तर गरजूंना मदतीचा हात देण्यासाठीही ओळखला जातो. त्याचा हा निर्णय नक्कीच लोकप्रितेत भर टाकणारा असेल यात शंका नाही. 

Read More