Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानच्या 'या' एक्स गर्लफ्रेंडचंही लैंगिक शोषण

जवळपास आठ वर्षांहून अधिक काळासाठी सलमानसोबत रिलेशनशिपमध्ये होती 

सलमानच्या 'या' एक्स गर्लफ्रेंडचंही लैंगिक शोषण

मुंबई: लैंगिक शोषण, अत्याचार, असभ्य वर्तणूक या साऱ्यांच्या शिकार झालेल्या महिलांनी त्यांच्यासोबतच्या काही प्रसंगाच्या कटू आठवणी सर्वांसमोर ठेवल्या आहेत. सोशल मीडियावर आणि सर्वच क्षेत्रांमध्ये सध्या याविषयीच्याच चर्चा पाहायला मिळत आहेत. 

कलाविश्वातून तुलनेने मोठ्या प्रमाणावर काही प्रसिद्ध चेहऱ्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्याचं पाहिलं. तर पीडितांच्या यादीत प्रसिद्ध अभिनेत्री असल्याचं विदारक सत्यही  समोर आलं.

आयुष्यात अशाच वाईट प्रसंगाला सामोरं जाणाऱ्यांमध्ये आता अभिनेता सलमान खान याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचंही नाव जोडलं गेलं आहे. 

जवळपास आठ वर्षांहून अधिक काळासाठी सलमानसोबत रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या सोमी अली हिलाही लैंगिक शोषणाचा शिकार व्हावं लागलं होतं. 

वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी ती लैंगिक शोषणाला बळी पडली होती. 

fallbacks

एका मुलाखतीत तिने याविषयीचा खुलासा केला. सोबतच आपण पाकिस्तानात घरगुती हिंसा आणि काहीशा वेगळ्या वातावरणात मोठं झाल्याचं स्पष्ट केलं. 

आईला किंवा तिच्या मैत्रिणींना त्यांच्या शरीरावर असणाऱ्या जखमा आणि व्रणांविषयी विचारताच त्या पायऱ्यांवरुन किंवा इतर कोणत्या ठिकाणहून पडल्या असंच उत्तर तिला मिळायचं. 

अतिशय विचित्र अशा परिस्थितीविषयीच वक्तव करताना आपल्या घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीनेच आपलं शोषण केल्याचं तिने उघड केलं. 

सध्याच्या घडीला सोमी एक एनजीओ चालवत असून, आता या प्रकारच्या घटनांविषयी ती खुलेपणाने बोलते. कारण, आमखी कोणी जर अशा प्रसंगांचा सामना करत असेल तर त्यांनाही याविषयी जाहीरपणे बोलण्याचं धाडस होईल. 

 

Read More