Marathi News> मनोरंजन
Advertisement

भावनिक पोस्टनंतरही संजय दत्त ट्रोल

नेटकऱ्यांनी करून दिली संजय दत्तला दुसऱ्या मुलीचीही आठवण

भावनिक पोस्टनंतरही संजय दत्त ट्रोल

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. पुन्हा एकदा त्याने शेअर केलेल्या एका फोटोमुळे तो चर्चेत आला असून, त्याला ट्रोल केले जात आहे. संजय दत्तने त्याची मुलगी इकरासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्याने एक भावनिक कॅप्शनही दिलं आहे. शेअर केलेल्या फोटोमधून संयज दत्त एक प्रोटेक्टिव आणि संवेदनशील पिता असल्याचं दिसत आहे. तरीही या फोटोला नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जात आहे. 

शेअर केलेल्या फोटोत संजय दत्तची मुलगी इकरा त्याच्या कुशीत बसली आहे. 'नॅशनल गर्ल चाइल्ड डे'च्या शुभेच्छा देत त्याने 'माझी मुलगी माझा खजिना आहे. प्रत्येक मुलीला प्रेम आणि तितकीच काळजी मिळावी अशी मी प्रार्थना करतो' असं कॅप्शन देत त्या दोघांचा फोटो पोस्ट केला. वडील-मुलीच्या नात्याला सुरेखपणे मांडणारा हा फोटो अनेकांची मने जिंकत असला तरी संजूबाबावर काही नेटकऱ्यांनी टिकेची झोड उठवली आहे.

'नॅशनल गर्ल चाइल्ड डे'च्या दिवशी संजय दत्तने त्याच्या लहान मुलीसोबतचा फोटो शेअर केला. परंतु संजय दत्तची मोठी मुलगी त्रिशालाबद्दल कोणतीही पोस्ट लिहिली नाही की कोणताही फोटो शेअर केला नाही. त्यामुळे दोघींमध्ये भेदभाव केल्याने त्याला ट्रोल केलं जातंय. संजय दत्तला आखणी एक मोठी मुलगी असल्याची आठवण नेटकऱ्याने यावेळी करून दिली. एका युजरने संजय दत्त त्याला दोन मुली असल्याचं लक्षात आणून दिलं. सोबतच त्रिशालाबद्दल तुमचं काय मत आहे? ती तुमची मोठी मुलगी आहे? असा सवाल केला.  

fallbacks

 

 

fallbacks

त्रिशाला ही संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्मा हिची मुलगी आहे. गेल्या अनेक काळापासून त्रिशाला भारतात राहत नसून अमेरिकेत तिच्या आजी-आजोबांसोबत राहत आहे. त्रिशाला आणि संजय दत्तचे अनेक फोटो तिच्या सोशल मीडिया वॉलवर पाहायला मिळतात. त्रिशालाचे तिच्या मान्यतासोबतही चांगले संबंध पाहायला मिळतात. त्यामुळे आता त्रिशालाही नेटकऱ्यांना काही उत्तर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

Read More