Marathi News> मनोरंजन
Advertisement

कपूर कुटुंबातील आणखी एक चेहरा प्रकाशझोतात; तिचा अफलातून 'बेली डान्स' व्हायरल

या कुटुंबातील बरीच मंडळी कलाविश्वात सक्रिय आहेत

कपूर कुटुंबातील आणखी एक चेहरा प्रकाशझोतात; तिचा अफलातून 'बेली डान्स' व्हायरल

मुंबई : हिंदी कलाविश्वातील अनेक प्रतिष्ठित कुटुंबांपैकीच एक कुटुंब म्हणजे बोनी कपूर आणि अनिल कपूर यांचं कुटुंब. चित्रपट निर्मितीपासून दिग्दर्शन आणि अभिनय क्षेत्रामध्ये या कुटुंबातील बरीच मंडळी सक्रिय आहेत. त्यामध्ये आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. ते नाव म्हणजे शनाया कपूर. म्हणजेच अभिनेता संजय कपूर याच्या मुलीचं. 

शनायासुद्धा कलाविश्वात पदार्पणासाठी सज्ज आहे. नुकतंच तिने एका चित्रपटामध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं. 'कारगिल गर्ल' या चित्रपटासाठी तिने योगदान दिल्याचं पाहायला मिळालं. इतकच नव्हे तर, शनाया अभिनय क्षेत्रातही पदार्पण करणार असल्याच्या चर्चा आहेत. अर्थात त्याविषयीची अधिकृत घोषणा अद्यापही झालेली नाही. 

एकिकडे शनायासुद्धा तिची वेगळी ओळख प्रस्थापित करु पाहत असतानाच एका व्हिडिओमुळे आता ती प्रकाशझोतात आली आहे. संजना मथुरेजाने हा व्हिडिओ इन्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये शनाया बेली डान्स हा नृत्य प्रकार सादर करताना दिसत आहे. 'बेली डान्स' प्रकारचं वाढतं वेड आणि त्याची लोकप्रियता पाहता, शनायाचा अंदाज खऱ्या अर्थाने लक्ष वेधत आहे हे नाकारता येणार नाही. 

संजनाकडून पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये शनाया मन लावून बेली डान्सचा सराव करताना दिसत आहे. तिच्या या कलेची कमेंट बॉक्समध्ये अनेकांनीच प्रशंसा केली आहे. विविध क्षेत्रांमध्ये आपली ओळख प्रस्थापिक करत चित्रपट वर्तुळात तग धरु पाहणारी शनाया आता यात कितपत यशस्वी ठरते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. 

Read More