Marathi News> मनोरंजन
Advertisement

SRK Video: वयाच्या 56 व्या वर्षी शाहरुखमध्ये मोठा बदल; रुप पाहून, तुम्हालाही बसेल धक्का

आपल्या आवडत्या अभिनेत्याला असं पाहताना कोणाला त्रास नाही होणार?   

SRK Video:  वयाच्या 56 व्या वर्षी शाहरुखमध्ये मोठा बदल; रुप पाहून, तुम्हालाही बसेल धक्का

Shah Rukh Khan Shirtless Video: काही दिवसांपूर्वीच अभिनेता शाहरुख खान यानं हिंदी चित्रपट विश्वात 30 वर्षे पूर्ण केली. त्याच्या कारकिर्दीतील हा प्रचंड मोठा टप्पा. आयुष्यातील या अत्यंत महत्त्वाच्या दिवशी किंग खाननं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये त्याच्या चेहऱ्यावर उतारवयाची सर्व चिन्हं अगदी स्पष्टपणे दिसत होती. 

शाहरुखच्या चेहऱ्यावर असणाऱ्या सुरकुत्या, त्याची निस्तेज त्वचा खूप काही सांगून गेली. किंग खानमध्ये झालेले हे बदल पाहता, शाहरुख तुझं वय वाढतंय... असंच चाहते कमेंटमध्ये म्हणू लागले. 

हा व्हिडीओ कमी होता, तोच त्याचा एक व्हिडीओही समोर आला. हा एका जाहिरातीला व्हिडीओ असून, त्यामध्ये बॉलिवूडचा हा बाजीगर शर्टलेस लूकमध्ये दिसत आहे. 

इथे मात्र त्याची शरीरयष्टी पाहता, 56 व्या वर्षीसुद्धा त्यानं शरीराकडे बरंच लक्ष दिल्याचं पाहायला मिळत आहे. शाहरुखचा हा लूक त्याच्या चाहत्यांना भावला असला तरीही काहींनी मात्र त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Godrej magic (@godrejmagic)

शाहरुखचं वय वाढत असल्याची आणि मुख्य म्हणजे ते त्याच्या चेहऱ्यावरही दिसत असल्याची बाब लक्षात घेता काही चाहत्यांना दु:खही झालं आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याला असं पाहताना कोणाला त्रास नाही होणार? 

Read More