Oscars 2023 : ऑस्कर पुरस्कारांच्या नव्या पर्वाची नुकतीच घोषणा झाली आणि अनेक कलाकारांनी, याचसाठी केला अट्टहास.... असं म्हणत आनंद व्यक्त केला. त्यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या नावाचाही समावेश आहे. नुकतंच अकॅडमी अवॉर्ड्सच्या वतीनं (Oscars nomination list 2023) ऑस्करच्या नामांकनाची यादी जाहीर केली. यामध्ये तब्बल 301 चित्रपटांचा समावेश आहे. इथं भारतीयांसाठी अभिमानाची बाब यासाठी, की देशातील काही उत्तमोत्तम कलाकृतींना ऑस्करच्या यादीत स्थान मिळालं आहे.
दाक्षिणात्य कलाजगतामध्ये धुमाकूळ घालणारा 'आरआरआर' (RRR), आलिया भट्टच्या दमदार अभिनयाची छाप असणारा 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiyawadi), देशातील संवेदनील मुद्द्यावर भाष्य करणारा 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files), मराठीतून 'मी वसंतराव' (Mi Vasantrao) या चित्रपटांचा समावेश आहे. भारतीय कलाजगतासाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे. असं असतानाच किंग खानची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (shah rukh khan on oscars) शाहरुखनं पुरस्कारांची घोषणा होण्याआधीच त्याचा आनंद साजरा करण्यास सुरुवातही केली आहे. एका अर्थी त्यानं पुरस्कारावर हक्कच सांगितला आहे. (Bollywood Actor Shah Rukh Khan wants to touch oscars 2023 trophy requests rrr actor ram charan)
RRR फेम अभिनेता राम चरण (Ram charan) यानं शाहरुखच्या 'पठान' (Pathan trailer) चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक केलं. ज्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देत शाहरुखनं राम चरणच्या चित्रपटाचा ऑस्करच्या यादीत स्थान मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. असं करत असताना त्यानं तुम्ही ऑस्कर भारतात आणाल तेव्हा मला फक्त त्याला स्पर्श करु द्या, अशी विनंतीसुद्धा दाक्षिणात्य अभिनेत्याला केली. अगदी हक्कानं किंग खाननं केलेली ही मागणी पाहता, त्याला नेमका किती आनंद झालाय हीच बाब लक्षात येत आहे. बरं, त्याच्या या मागणीवर, हो अगदी! अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत राम चरणनं हा पुरस्कार भारतीय चित्रपट विश्वासाठीच असेल असं म्हटलं.
Of course @iamsrk Sir!
— Ram Charan (@AlwaysRamCharan) January 10, 2023
The award belongs to Indian Cinema https://t.co/fmiqlLodq3
इथं लक्षात घेण्याजोगी बाब अशी, की हिंदी कलाजगत गाजवणाऱ्या शाहरुखनं आतापर्यंत असंख्य पुरस्कार जिंकले. पण, या कारकिर्दीमध्ये कधीच तो ऑस्करपर्यंत मजल मारू शकला नाही. त्यामुळं या पुरस्काराप्रती त्याच्याही मनात असणारं कुतूहल यानिमित्तानं सर्वांसमोर आलं.