Marathi News> मनोरंजन
Advertisement

आर्यनची काळजी घेण्यासाठी शाहरुखचा फौजफाटा; पाहा NCB ऑफिसबाहेरील दृश्य

रविवारपासूनच अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा एनसीबीच्या ताब्यात आहे

आर्यनची काळजी घेण्यासाठी शाहरुखचा फौजफाटा; पाहा NCB ऑफिसबाहेरील दृश्य

मुंबई : रविवारपासूनच अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा एनसीबीच्या ताब्यात आहे. ड्रग्ज प्रकरणात नाव पुढे आल्यामुळं दर दिवशी आर्यनसमोर असणाऱ्या अडचणी सतत वाढतच चालल्या आहेत. तिथं आर्यन अडचणीत असतानाच इथे त्याला कोणत्याही गोष्टीची गैरसोय होऊ नये याची शाहरुख आणि त्याची संपूर्ण टीम काळजी घेताना दिसत आहे.

गुरुवारी शाहरुखसाठी काम करणाऱ्या स्टाफपैकी काही मंडळी एनसीबीच्या कार्यालयाबाहेर दिसली. यावेळी ते आर्यनला जेवणाचा डब्बा आणि त्याच्या गरजेच्या इतर गोष्टी पोहोचवण्यासाठी आले होते. डब्बा आणि सुटकेस घेऊन ही मंडळी एनसीबीच्या ऑफिसबाहेर दिसली.

यापूर्वी शाहरुखची पत्नी गौरी खान हिनं आर्यनसाठी एनसीबी कार्यालयात बर्गर नेण्याचा प्रयत्न केला होता. पण, तिला यासाठीची परवानगी नाकारण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव तिला ही परवानगी नाकारण्यात आली होती.

fallbacks

आर्यन खान अटक प्रकरणातील जामीनाच्या याचिकेवर आज (शुक्रवारी) सुनावणी करण्यात येणार आहे. एनसीबीनं त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली असून, प्राथमिक स्तरावर ही मागणी नाकारण्यात आल्याचं कळत आहे. तेव्हा आता आईच्या म्हणजेच गौरी खान हिच्या वाढदिवसाच्याच दिवशी आर्यनची सुटका होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read More