Marathi News> मनोरंजन
Advertisement

अर्रsss; कॅमेरा सुरु झाला तरी पत्नीसोबत शाहिदचं Lip lock सुरुच; Photo Viral

सध्या मात्र ते एका भलत्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. 

अर्रsss; कॅमेरा सुरु झाला तरी पत्नीसोबत शाहिदचं Lip lock सुरुच; Photo Viral

मुंबई : अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि त्याची पत्नी, मीरा राजपूत (Mira Rajput)ही जोडी कायमच त्यांच्या केमिस्ट्रीसाठी चर्चेत असते. चित्रपट वर्तुळाशी थेट संबंध नसतानाही शाहिदच्या आयुष्यात आलेल्या मीरानं त्याच्या विश्वात एक कायमस्वरूपी आणि भक्कम असं स्थान तयार केलं. 

मीरा आणि शाहिद यांच्या नात्याबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण, सोशल मीडियाच्या माध्यमातून या जोडीमध्ये असणारे नात्याचे सुरेख बंध कायमच पाहता येतात. 

पण, सध्या मात्र ते एका भलत्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. 

हे कारण म्हणजे त्यांचा किस करतानाचा व्हायरल होणारा फोटो. 

फोटो पाहताना असंच दिसतंय की किस करताना कॅमेरा सुरु होता हे ही जोडी विसरली की काय? 

पण, मुळात मीरानंच फोटोच्या कॅप्शनमधून सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. 

रविवारचा वेळ कसा चाललाय, हेच तिचा हा फोटो पाहून लक्षात येत आहे. जिथं मोठ्या शिताफीनं तिनं शाहिदचा आणि तिचा चेहरा लपवून तिथं बरोबर मोबाईलचा कॅमेरा आणला आहे. 

सोशल मीडियावर सध्या बी टाऊनच्या या सिझलिंग कपलही ही केमिस्ट्री भलतीच व्हायरल होत आहे. 

Read More