Marathi News> मनोरंजन
Advertisement

पत्नीसह शाहिदचा मोठा निर्णय; पाहा त्यानं काय करायचं ठरवलंय

शाहिद कपूर हा कायमच त्याच्या खासगी आयुष्यातील निर्णयांसाठी ओळखला जातो

पत्नीसह शाहिदचा मोठा निर्णय; पाहा त्यानं काय करायचं ठरवलंय

मुंबई : अभिनेता शाहिद कपूर हा कायमच त्याच्या खासगी आयुष्यातील निर्णयांसाठी ओळखला जातो. चित्रपट असो किंवा व्यक्तीगत आयुष्यातील निर्णय, शाहिदनं कायमच सर्वांपुढे आदर्श प्रस्थापित केला आहे. तो मुंबईत सध्या जुहू येथे पत्नी आणि मुलांसोबत राहत आहे. शिवाय वरळी येथेही त्याचं मोठं अपार्टमेंट आहेत. आता म्हणे ही सेलिब्रिटी जोडी एका अशा निर्णय़ावर पोहोचली आहे जिथं त्यांनी नव्या घरी जाण्याचा निर्णय़ घेतला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहिद आणि मीरा त्यांच्या नव्या घराच्या बांधकामादरम्यानचे फोटो शेअर करत असतात. नुकतंच मीरानं शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ती आणि शाहिद घरातील पायऱ्यांवर उभे राहून काहीतरी बोलत असल्याचं दिसत आहेत.

मीराच्या या इन्स्टा स्टोरीमध्ये तिनं डिझायनर अंकुर खोसला यालाही टॅग केलं आहे. तिची ही पोस्ट पाहता घरातील इंटेरियरचं काम सुरु असल्याचं स्पष्ट होत आहे. शाहिद आणि मीरानं 2018 मध्ये 56 कोटींना 42 आणि 43 व्या मजल्यावर आलिशान घर खरेदी केलं होतं. त्यांच्या घरातून वांद्रे वरळी सागरी सेतूचं सुरेख दृश्यही दिसतं असं म्हटलं जातं. या घराचं काम सध्या आटोपण्याच्या मार्गावर असून येत्या काळात ही जोडी या नव्या घरात वास्तव्यास जाणार आहे.

fallbacks

2015 मध्ये शाहिद आणि मीरा विवाहबंधनात अडकले होते. मिशा आणि झैन अशा दोन मुलांचं पालकत्व आता ही जोडी पार पाडत आहे. शाहिद आणि मीरा नक्कीच बी- टाऊन मधील एक स्टार कपल आहेत यात शंका नाही.

Read More