Marathi News> मनोरंजन
Advertisement

Shahid Kapoor च्या पत्नीचं दुसरं लग्न? काळजावर दगड ठेवून पोस्ट केला फोटो

दोन मुलांच्या जन्मानंतर तर त्यांचं नातं आणखी घट्ट होताना दिसलं. पण...

Shahid Kapoor च्या पत्नीचं दुसरं लग्न? काळजावर दगड ठेवून पोस्ट केला फोटो

मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत कपूर हे सध्याच्या घडीला बऱ्याच जोड्यांना कपल गोल्स देणाऱ्या Couple पैकी एक. कलाजगताशी थेट संबंध नसताना मीरानं शाहिदशी लग्न करत हे नातं निभावलं. दोन मुलांच्या जन्मानंतर तर त्यांचं नातं आणखी घट्ट होताना दिसलं. पण, आता म्हणे या दोघांमध्ये तिसऱ्याची एंट्री झाली आहे. (shahid Kapoor Mira kapoor)

ही तिसऱ्याची एंट्री आताच झालीये का, असा प्रश्न तुम्हाला पडत असल्यास त्याचं उत्तर आहे... नाही. हा तिसरा बराच आधीपासून त्यांच्या नात्यात आला आहे.

शाहिदलाही याची कल्पना होती. पण, तो यावर फार लक्ष देत नव्हता. कारण मीराची त्याला साथ होती. आता मात्र हद्द झाली आणि शाहिद सोबत असतानाही मीराला ‘तो’च जास्त महत्वाचा वाटू लागला.

पत्नी कोणा दुसऱ्यातच रमत असताना पाहून अखेर शाहिद जाहीरपणे व्यक्त झाला आणि खरं चित्र जगासमोर आलं.

पत्नीनं त्याच्याशी लग्न केल्याचं म्हणत शाहिदनं तिच्यासोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला.

हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल, कारण मीरानं ज्याच्याशी लग्न केलं आहे तो दुसरातिसरा कोणी नसून तिचा मोबाईल फोनच आहे.

आलंना चेहऱ्यावर हसू? मीराचं सतत फोनमध्ये डोकावणं शाहिदलाही फारसं रुचत नाही, पण पत्नीवरील प्रेमाखात तो तिची ही सवयसुद्धा सुरेखपणे स्वीकारताना दिसतो.

आपल्या नात्याची सुंदर बाजू शाहिद कायम चात्यांच्या भेटीला आताना दिसतो. त्यानं नुकताच शेअर केलेला व्हिडीओसुद्धा त्याचाच एक भाग, असं म्हणायला हरकत नाही.

त्यानं पोस्ट केलेला हा व्हिडीओ पाहता, मीरा बेवफा झाली का? हा विनोदी प्रश्न शाहिदला केल्यास काहीच हरत नाही...

Read More