Marathi News> मनोरंजन
Advertisement

गरोदरपणात शाहिदच्या पत्नीनं जे केलंय, ते आजपर्यंत भल्याभल्य अभिनेत्रींना जमलं नसावं

मुलांचं संगोपन करण्यासोबतच ती... 

गरोदरपणात शाहिदच्या पत्नीनं जे केलंय, ते आजपर्यंत भल्याभल्य अभिनेत्रींना जमलं नसावं

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor)याची पत्नी, मीरा राजपूत ही त्या सेलिब्रिटी पत्नींपैकी एक आहे जिच्यावर कायम माध्यमांच्या नजरा खिळलेल्या असतात. दोन मुलांच्या जन्मानंतरही मीरानं तिचा फिटनेस जपल्याचं पाहायला मिळालं आहे. 

मुलांचं संगोपन करण्यासोबतच ती या साऱ्यामध्ये स्वत:लाही तितकाच वेळ देताना दिसत आहे. 

सोशल मीडियावर सध्या मीराचे काही व्हिडीओही व्हायरल होत आहेत. जिथे ती सौंदर्याशी संबंधित काही ट्रीक्स सर्वांशी शेअर करताना दिसते. 

तुम्हाला माहितीये का, शाहिदच्या पत्नीनं म्हणजेच मीरानं गरोदरपणात असं काही करुन दाखवलं जे पाहता तिनं खऱ्या अर्थानं बड्या अभिनेत्रींना टक्कर दिली असं म्हणावं लागेल. 

हा किस्सा आहे अभिनेत्री सोनम कपूर हिच्या लग्नातील. जिथं अनेक सेलिब्रिटींची हजेरी होती. 

मीरा आणि शाहिदही रेड कार्पेटवर आले. तेव्हा ती 4 महिन्यांची गरोदर होती. 

मीरानं यावेळी ज्या लूकला पसंती दिली होती, तो अतिशय लक्षवेधी होता. सोबर पण तरीही चारचौघांत उठून दिसेल असाच तिचा लूक होता. 

प्रसिद्ध सेलिब्रिटी डिझायनर अनामिका खन्नाच्या कलेक्शनमधून तिनं शार्प सेपरेट्स सेट्सला पसंती दिली होती. 

ज्यामुळं मॉडर्न आणि पारंपरिक असे दोन्ही टच तिच्या लूकला मिळत होते. 

बस्टियर टॉप ,पेन्सिल स्कर्ट आणि काँट्रास्ट ओढणी असा तिचा लूक होता. याला खास टच देण्यासाठी सिल्क ऑग्रँजाचा एक बेल्ट वापरण्यात आला होता.

हाय हिल्स नसतानाही फ्लॅट्सही तिला शोभून दिसत होत्या. बेबी बंप लपवण्यासाठी तिनं ओढणी एका बाजुनं फिरवून वापरली होती. 

मीराचा हा लूक पाहता तिची स्टाईलबाबतची समज सर्वांपुढे आली. शिवाय अनेकजणींना गरोदरपणातही ठराविक कपड्यांच्या पलीकडे जाऊन काही नव्या संकल्पना पाहता आल्या. 

Read More