Shah Rukh Khan : 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानला त्याच्या 'जवान' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आलं आहे. 'जवान' हा शाहरुख खानच्या कारकिर्दीमधील सर्वात मोठा आणि सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आता यावर शाहरुख खानने ट्विट करत त्याची पहिली प्रतिक्रिया व्हिडीओद्वारे दिली आहे.
'जवान' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आल्यानंतर शाहरुख खानने ट्विट करत म्हटले की, राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मला अत्यंत कृतज्ञता, अभिमान आणि नम्रता वाटते. हा एक असा क्षण आहे जो मी आयुष्यभर जपून ठेवेन. ज्यूरी, अध्यक्ष आणि मंत्रालयाचे मनःपूर्वक आभार. ज्यांनी मला या सन्मानासाठी योग्य समजले. ‘जवान’ चित्रपटाचे दिग्दर्शक अॅटली, लेखक आणि इतर टीमचे देखील त्याने विशेष आभार मानले. ज्यांनी 'जवान'मध्ये मला संधी दिली आणि माझ्यावर विश्वास ठेवला त्याचे देखील आभार मानले.
या व्हिडीओमध्ये शाहरुख खानच्या हाताला दुखापत झाल्याचे दिसत आहे. यावेळी त्याने व्हिडीओमध्ये आपल्या दुखापतीचा उल्लेख करत मी नेहमीप्रमाणे हात पसरून प्रेम वाटू इच्छित होतो पण सध्या थोडासा अस्वस्थ आहे. काळजी करू नका, फक्त पॉपकॉर्न तयार ठेवा. मी लवकरच थिएटरमध्ये परतणार आहे असं त्याने म्हटले.
सर्वोत्कृष्ट अभिनेता – शाहरुख खान (जवान) आणि विक्रांत मॅसी (12th फेल)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – राणी मुखर्जी (Mrs. Chatterjee Vs Norway)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सुदीप्तो सेन (The Kerala Story)
सर्वोत्कृष्ट चित्रपट – 12th फेल
सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट – रॉकी और रानी की प्रेम कहानी
Thank you for honouring me with the National Award. Thanks to the jury, the I&B ministry… Iss samman ke liye Bharat Sarkar ka dhanyawaad. Overwhelmed with the love showered upon me. Half a hug to everyone today…. pic.twitter.com/PDiAG9uuzo
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 1, 2025
या पुरस्कारासह शाहरुख खानच्या दीर्घ चित्रपटकारकिर्दीतील एक महत्त्वाचा अध्याय पूर्ण झाला आहे. स्वदेस, चक दे इंडिया, माय नेम इज खान यांसारख्या दमदार भूमिकांनंतर अखेर 'जवान'ने त्याला राष्ट्रीय गौरव मिळवून दिला आहे. अशातच आता शाहरुख खान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा 'किंग' चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्याला दुखापत देखील झाली आहे. आता चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.