मुंबई : बॉलिवूडमध्ये अगदी कमी वेळातच चाहत्यांच्या मनावर राज्य करत आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं कायमच आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. चित्रपट असो किंवा जीवानाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, सुशांतनं कायमच आपल्या बुद्धिचातुर्यानं सर्वांना अवाक् केल्याचं पाहायला मिळालं आहे.
सारंकाही आलबेल असताना सुशांतनं काहीशा अपयशानं खचून जात आयुष्याचा अंत करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निधनाचं वृत्त सर्वांनाच धक्का देऊन गेलं. काहींसाठी सुशांतच्या मृत्यूचं गुढ अद्यापही उकललं नाहीये. असं असतानाच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकतीच झालेली हालचाल सर्वांच्या भुवया उंचावून गेली.
सुशांतच्या आठवणीत त्याचे चाहते अनेकदा त्याचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. पण, आता मात्र त्याच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर प्रोफाईल फोटो बदलल्यामुळं, पुन्हा एकदा सुशांत आपल्यातच असल्याची चाहून चाहत्यांना लागल्याचं दिसून येत आहे.
#SSR 2 days ago activity on his page,
— Lucky Gupta (@theluckygupta) August 20, 2021
Most probably by his social media team.
Legends live forever #SushantSinghRajput pic.twitter.com/sgBJLp7wcQ
चाहते झाले भावुक
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या टीमनं त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन प्रोफाईल फोटो अपडेट केला होता. हे पाहताच चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सची बरसात करण्यास सुरुवात केली. अनेक चाहत्यांनी भावुक होत सुशांतच्या आठवणींना उजाळा देण्यास सुरुवातही केल्याचं पाहायला मिळालं.