Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नानंतर Vicky - Katrina कुठे जाणार Honeymoon ला? पाहून विचारातच पडाल

विकी आणि कतरिना आपआपल्या परीनं लग्नाची तयारी केली

लग्नानंतर Vicky - Katrina कुठे जाणार Honeymoon ला? पाहून विचारातच पडाल

मुंबई : सध्याच्या घडीला बॉलिवूडची आघाडीची जोडी, म्हणून चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसं या दोघांशीही संबंधीत बहुविध विषयांवरील माहितीही सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. 

एकिकडे विकी आणि कतरिना आपआपल्या परीनं लग्नाची तयारी केली जात असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे ते आपल्या कामावरही लक्ष केंद्रीत करताना दिसत आहेत. (Vicky - Katrina )

सूत्रांच्या माहितीनुसार विकी आणि कतरिनानं अद्यापही पाहुण्यांना लग्मपत्रिका पाठवलेली नाही. पण, तरीही या कार्यक्रमाबाबत त्यांच्या मित्रपरिवाराला कल्पना आहे. येत्या काळात कतरिना तिच्या जीवनातील टप्प्याची माहिती सर्वांना देऊ शकेल अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. 

विकी आणि कतरिना त्यांच्या लग्नाच्या तयारीत असतानाच आता प्रश्न राहिला तो म्हणजे ही जोडी लग्नानंतर फिरायला कुठे जाणार याबाबतचा, अर्थात त्यांच्या हनिमूनचा. तर, ही जोडी लग्नानंतर कुठेही जाणार नसल्याचं म्हटलं जात आहे. 

सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर ही जोडी पुन्हा एकदा आगामी प्रोजेक्टच्या निमित्तानं कामावर परतणार आहेत. त्यांच्याकडे 15 दिवसांचा मोकळा वेळ असेल. यामध्ये 3 - 4 दिवस फक्त लग्नविधींसाठीच लागणार आहेत. ज्यानंतर ही जोडी त्यांच्या नव्या घरात वास्तव्यास जाणार आहे. किमान सध्यातरी या जोडीनं कामालाच प्राधान्य दिल्याचं या साऱ्यातून स्पष्ट होत आहे. 

Read More