Marathi News> मनोरंजन
Advertisement

कतरिनाला विकीचा मोह आवरेना... सर्वात बोल्ड फोटोवर खिळल्या नजरा

कामाच्या व्यापातूनही ही जोडी सातत्यानं एकमेकांसाठी वेळ काढताना दिसली.

कतरिनाला विकीचा मोह आवरेना... सर्वात बोल्ड फोटोवर खिळल्या नजरा

मुंबई : गेल्या वर्षीचा शेवट बॉलिवूडकरांसाठी फारच गोड ठरला. कारण, असंख्य चर्चा आणि व्हायरल होणाऱ्या बातम्यांमध्येच विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी लग्न केल्याचं जाहीर केलं. त्यांचे फोटोही सर्वांनी पाहिले आणि नकळतच या जोडीला जवळचं मानत सर्वांनीच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. (Vicky kaushal Katrina kaif)

विकी आणि कतरिना पाहता बाहता बॉलिवूडचं Power Couple झालं. कामाच्या व्यापातूनही ही जोडी सातत्यानं एकमेकांसाठी वेळ काढताना दिसली. कुठे फिरण्यासाठी असो किंवा मग एखाद्या कार्यक्रमासाठी, पार्टीसाठी असो. विकी तिथे कतरिना हेच चित्र पाहायला मिळालं. 

'विकॅट'चे फोचो व्हायरल होत असतानाच आता कतरिनानं पुन्हा एकदा पतीसोबतचा सर्वात रोमँटिक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिनं त्यासाठी लिहिलेलं कॅप्शनही तितकंच खास आहे. 

Me and Mine... असं कॅप्शन तिनं या फोटोसाठी लिहिलं. फोटोमध्ये विकी आणि कतरिना एका स्विमिंग पूलमध्ये दिसत आहेत. इथं कतरिनानं विकीला घट्ट मिठी मारली आहे. हे पाहता तिला काही विकीचा मोह आवरत नाहीये, असंच दिसतंय. 

सिझलिंग केमिस्ट्री असणारा विकी- कॅटचा हा फोटो पाहिल्यानंतर फॉलोअर्स आणि नेटकरीही त्यावर व्यक्त झाले आहेत. काहींनी तर, यांना सारखी सुट्टी मिळते बरी...; यांची सुट्टी संपत नाही आणि आम्हाला मिळत नाही... अशाही प्रतिक्रिया त्यांच्या फोटोंवर दिल्या आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

प्रतिक्रिया काहीही असो, नात्याचा प्रत्येक क्षण आनंदात व्यतीत करण्यालाच विकी आणि कतरिना प्राधान्य देताना दिसत आहेत; हेच त्यांचे हे गोड क्षण पाहून लक्षात येत आहे. 

Read More