Marathi News> मनोरंजन
Advertisement

रणबीरचे वजन, शाहरुखचा ग्लॅमर आणि अजयचा नवा अंदाज बॉलिवूड कलाकारांचा हटके अंदाज

Bollywood Actor's Funny Ponytail Video : बॉलिवूड कलाकारांच्या त्या AI व्हर्जननं वेधलं लक्ष... 

रणबीरचे वजन, शाहरुखचा ग्लॅमर आणि अजयचा नवा अंदाज बॉलिवूड कलाकारांचा हटके अंदाज

Bollywood Actor's Funny Ponytail Video : इन्स्टाग्राम असं ठिकाण आहे जिथे लोक वेगवेगळ्या गोष्टी अगदी सहजपणे शेअर करताना दिसतात. त्यात आता एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय की सगळ्या कलाकारांमध्ये सगळ्यात चांगलं कोण दिसतंय. शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, हृतिक रोशन ते रणबीर कपूर बरेच कलाकार यात दिसत आहेत. या व्हिडीओसोबत विचारण्यात आलं आहे की तुमचा आवडता अभिनेता कोण आहे. पण उत्तर देताना नेटकऱ्यांनी काय सांगितलं जाणून घ्या. त्याचं कारण म्हणजे या सगळ्या कलाकारांचे खरे फोटो आणि खरे व्हिडीओ न वापरता एआय व्हिडीओ वापरण्यात आले आहेत. 

व्हिडीओमध्ये शाहरुख खान आणि सलमान खान यांनी दोन पोनी घातल्या आहेत. तर रणबीर थोडा लठ्ठ झाल्याचे दिसत आहे. बॅकग्राऊंड म्यूजिकनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. हा AI व्हिडीओ multiversematrix नावाच्या इन्स्टाग्राम चॅनलवरून शेअर करण्यात आला आहे. 

लोकांनी या व्हिडीओवर विविध कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, शाहरुख चाहत्यांच्या मनावर राज्य करतो पण सलमान खानचा स्वॅग कमी होऊ शकत नाही. तर कोणी मस्करीत म्हटलं की दोघे भाऊ आहेत. दुसरा नेटकरी म्हणाला रणबीरला पाहायला मज्जा येतेय. तो खूप गोंडस दिसतोय. तर असे अनेक चाहते आहेत. आमिर खानला पाहून तर त्यानं गोंडस दिसण्यात रणबीरला मागे टाकलं आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, कलाकारांचा इतका अपमान. आणखी एक नेटकरी म्हणाला, रणबीर कूपर तर लाडू प्रमाणे दिसतोय. काही लोकांनी रणवीर सिंगला 'पूकी' आणि शाहरुख खानला 'क्यूटी' देखील म्हटलं आहे. 

सोशल मीडियावर 

सोशल मीडिया पर नया ट्रेंड्स पाहता शाहरुख खान आणि सलमानशिवाय इतर सगळ्यांची फॅन फॉलोइंग इतकी जास्त आहे. नवीन जनरेशन असो किंवा मग जुनं, या रीलवर प्रत्येक व्यक्ती प्रतिक्रिया देतोय. 

Read More