Marathi News> मनोरंजन
Advertisement

अनोळखी अभिनेत्यासोबत बॉलिवूड अभिनेत्रीला असं काही करायला सांगितलं की....

कलाविश्वात सुरुवातीच्याच काळात तिला हा अनुभव आला होता. 

अनोळखी अभिनेत्यासोबत बॉलिवूड अभिनेत्रीला असं काही करायला सांगितलं की....

मुंबई : हिंदी कलाविश्वात दर दिवशी अनेक नवे चेहरे त्यांच्या करिअरच्या दृष्टीने असंख्य अपेक्षा सोबत घेऊन येतात. त्यांच्यापैकी बऱ्याचजणांना त्यांच्या या प्रवासात यश मिळतं, तर काहींना सुरुवातीलाच काही विचित्र अनुभव. असाच एक विचित्र अनुभव अभिनेत्री अदिती राव हैदरी हिलाही आला होता. चित्रपटविश्वात कारकिर्दीच्या सुरुवातीलाच तिला एका अनपेक्षित प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. खुद्द अदितीनेच एका मुलाखतीत याविषयीचा खुलासा केला. 

अनिता श्रॉफ अदजानियाच्या 'फीट अप विथ स्टार्स' या चॅट शोमध्ये तिला एका सत्रात ऑडिशनच्या सर्वात विचित्र आठवणीविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्याच प्रश्नाचं उत्तर देत तिने हा खुलासा केला. बॉलिवूडमधील दुसऱ्या चित्रपटाविषयीची एका विचित्र प्रसंगाचा खुलासा तिने केला. 'ये साली जिंदगी' हा चित्रपट वगळता माझ्याकडे अगदी विचित्र सांगण्यासारखं असं काहीच नाही. कारण, त्या चित्रपटाच्या वेळी अनोळखी व्यक्तीशी इंटिमेट होण्यास मला सांगण्यात आलं होतं, असं ती म्हणाली. 

'त्या क्षणी मी त्यांना ओळखतही नव्हते. ते असे धिप्पाड माझ्यसमोर आले आणि इथे हे चाललंय तरी काय... अशीच माझी प्रतिक्रिया होती', असा खुलासा तिने केला. 'ये साली जिंदगी' या चित्रपटातून अदिती अभिनेता अरुणोदय सिंग याच्यासोबत झळकली होती. या चित्रपटात त्यांच्या काही इंटिमेट दृश्यांचाही समावेश होता. आपल्या या चित्रपटाशी निगडीत आणखी एक बाबही तिने स्पष्ट केली जेव्हा तिला इंटरनेटवर तिची काही बॅकलेस छायाचित्र आढळली होती. एका वळणावर तर तिने गुगलवर स्वत:चं नाव सर्च करणंही टाळणं सुरु केलं होतं. 

आपल्या सौंदर्याच्या बळावर प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या अदितीने सोनम कपूर आणि अभिषेक बच्चन यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'दिल्ली ६' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' या चित्रपटातूनही ती झळकली होती. या चित्रपटात तिने रणविरने साकारलेल्या अलाउद्दीन खिल्जीच्या पत्नीची म्हणजेच मेहरुनीसाची भूमिका साकारली होती. 'अंतरिक्षम 9000 KMPH' या तेलुगू चित्रपटातही ती झळकली होती. 

Read More